पंढरपूर : उन्हाळ्यापूर्वीच महाराष्ट्रात शहरावर पाणी संकट ओढवल आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणात मार्चपर्यंत पुरेल एवढ्याच पाणी साठा उपलब्ध असल्याचs नगरपालिकेचे म्हण आहे. त्यामुळे उन्हाळ्यात पाण्यासाठी नागरिकांचे हाल होऊ नयेत म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून नगर पालिकेने शहरातील पाण्यासंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
पाणी जरा जपूनच वापरा
यंदा पाऊस कमी झाल्याने पहिलेच उजनी धरणात पाणी साठा कमी झाला होता. अशातच शेतीला पाणीपुरवठा करण्यासाठी कालव्यातून पाणी सोडण्यात आले आहे. उन्हाळ्यापूर्वीच या धरणातील पाणी साठा हा 4 टक्के एवढ्याच असल्याचे समोर आले आहे. त्यात उजनी धरणातून भीमा नदीला कधी पाणी सोडणार याबाबत अद्याप वरिष्ठ पातळीवर निर्णय झालेला नाही. त्यामुळे मार्च अखेरपर्यंत शहराला पुरेल इतका पाणीसाठा बंधाऱ्यात आहे.
त्यामुळे खबरदारी म्हणून नगरपालिकेने आजपासून शहराला एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. या पाणी संकटाचा फटका सर्वसामान्यांसोबत पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना बसणार आहे.