अकलूज (सोलापूर): राज्यातील महायुतील जागा वाटपावरून मित्रपक्षांमध्ये नाराजी नाट्य दिसू लागले आहे. महायुतीतील जागा वाटपाचा तिढा सोडवण्यासाठी बैठकांचा सिलसिला सुरु आहे. अशातच माढ्यामध्ये खासदार रणजितसिंह निंबाळकरच्या उमेदवारीला राष्ट्रवादी आणि भाजपमधील काही नेत्यांचा विरोध पाहायला मिळाला होता. निंबाळकर यांच्या विरोधात एक गट एकवटला आहे. त्यावेळी माजी मंत्री विजयसिंह मोहिते पाटील हे शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा होत्या. आता ते जवळपास निश्चित झाले असून येत्या चार दिवसांमध्ये मोहिते पाटील यांचा शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश होण्याचे संकेत जयसिंह मोहिते पाटील यांनी दिले आहेत.