जिंती : जिंती (ता. करमाळा) येथील उत्तम माधव धेंडे (वय-58) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने शुक्रवारी (ता. 4) निधन झाले आहे. अत्यंत हुशार, प्रेमळ, मनमिळावू व्यक्तिमत्त्व हरपल्याने जिंतीसह कुर्डूवाडी परिसरात शोककळा पसरली आहे.
उत्तम धेंडे हे मागील ३० वर्षापासून कुर्डूवाडी (ता. माढा) येथील डॉ. बाबासाहेब आंबडेकर प्रशाला व महात्मा फुले ज्युनिअर कॉलेज या महानगरपालिकेचे शाळेत नाईक या पदावर कार्यरत होते. व कार्यतत्पर असलेले व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख होती. उत्तम धेंडे यांना शुक्रवारी (ता. 4) अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला. आणि उपचार मिळण्यापूर्वीच त्यांचे दुख:द निधन झाले.
दरम्यान, उत्तम धेंडे यांच्या पार्थिवावर जिंती येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, मुलगी, जावई व नातवंडे असा परिवार आहे. लोणी काळभोर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस हवालदार केतन धेंडे यांचे ते वडील होत.