मल्हारपेठ : नवारस्ता (ता. पाटण) येथील शेअर मार्केट फसवणूक प्रकरणात मल्हारपेठ पोलिसांनी दोन जणांना अटक केली. दरम्यान, या दोघांना पाटण न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. राजेंद्र शंकर डोंगळे व रोहित बही राजेंद्र डोंगळे (दोघेही रा. नवारस्ता, ता. पाटण) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.
याबाबत मल्हारपेठ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी नितीन सर्जेराव शिर्के (रा. अडूळ, ता. पाटण) यांनी मल्हारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. फिर्यादीत म्हटले होते की, नवारस्ता येथील कोठे राजेंद्र शंकर डोंगरे, सूरज राजेंद्र ची डोंगरे व रोहित राजेंद्र डोंगरे यांनी संगनमत करून शेअर मार्केटविषयी मला माहिती दिली होती. त्यामध्ये पैसे गुंतवणूक करण्याचे सांगून त्यातून भरपूर परतावा देण्याचे आमिषे त्यांनी मला दाखवले होते. त्यांनी माझ्याकडून ऑनलाईन पध्दतीने नऊ लाख रुपये, रोख स्वरूपात तीन लाख रुपये असे एकूण १२ लाख रुपये घेतलें होते.
त्यापैकी तीन लाख रुपये त्यांनी परत केले असून उर्वरित नऊ लाख रुपयांची माझी आर्थिक फसवणूक झाली असल्याचे म्हटले आहे. याबाबत पोलिसांनी संशयितांवर गुन्हा नोंदवून राजेंद्र डोंगळे व रोहित डोंगळे यांना अटक केली. त्यांना शुक्रवारी पाटण न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.