पंढरपूर : राज्यात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांचा प्रचार करत आहेत. अनेक नेते दावे-प्रतिदावे करताना दिसत असून टीका टिप्पणी सुद्धा करत आहेत. अशातच अजित पवार यांना जनतेचा मूड लक्षात आला आहे. जनतेचा मुड महा विकास आघाडी सत्तेत आणायची असा असल्याने गावोगावी फिरत आहेत. त्यामुळेच अजित पवार याना बारामती मतदारसंघात देखील गावोगावी जाऊन प्रचार करण्याची वेळ आली; असा टोला खासदार अमोल कोल्हे यांनी लगावला आहे. पंढरपूर मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचार सभेनिमित्ताने खासदार अमोल कोल्हे पंढरपुरात आले होते. यावेळी ते बोलत होते.
अमोल कोल्हे यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. यावेळी कोल्हे म्हणाले, कि चुकीला माफी होऊ शकते. मात्र गद्दारीला माफी होऊ शकत नाही. ३५ वर्ष राजकारणात असलेल्या अजित पवारांना भावनिक आवाहन करण्याची वेळ आली आहे.
दल बदलूंना मतदार स्वीकारणार नाही. पंढरपूर विधानसभा मतदारसंघात अनिल सावंत हेच महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. दोन पक्षाकडे उमेदवारी मागणारे हे काँग्रेसचे उमेदवार भालके आहेत. प्रत्येक वेळी पक्ष बदलणाऱ्या दल बदलूना पंढरपूर मंगळवेढामधील मतदार स्वीकारणार नाहीत; असे देखील खासदार कोल्हे बोलले.