अहमदनगर : सोशल मीडियातील व्हिडिओच्या माध्यमातून अनेक जण आपल नशीब आजमावत असतात. काहीना यश येत काहींना नाही. अशीच एक बातमी अहमदनगर मिळत आहे. शहरात बोल्हेगाव परिसरातील गांधीनगर येथे राहणाऱ्या एका युवकाने चक्क पॅलेस्टाईनला जाऊन युद्धात शहीद होण्याचा निर्णय घेतला होता. इस्राईल आणि पॅलेस्टाईन युद्धाचे व्हिडिओ पाहून हा युवक प्रभावित झाला होता आणि त्यातूनच पॅलेस्टाईनला जायचे लक्ष्य डोक्यात ठेवत मुस्लिमांसाठी युद्धात शहीद व्हायचे आहे, असा विचार करुन त्याने थेट मुंबई सुद्धा गाठली. मात्र मित्रांच्या आणि कुटुंबीयांच्या मदतीने त्या तरुणाला अहमदनगरमध्ये परत आणण्यात पोलिसांनी यश आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अहमदनगर शहरात नगर-मनमाड महामार्गावरील बोल्हेगाव परिसरात, गांधीनगर येथे हा 20 वर्षीय तरुण राहत होता. तो नेहमी मोबाईलवर इंस्टाग्राम आणि युट्युबच्या माध्यमातून इस्राईल आणि पॅलेस्टाईन युद्धाचे व्हिडिओ पाहत होता आणि मित्रांबरोबर मुस्लिम समाजावर होणाऱ्या अत्याचाराबाबत चर्चा करत होता.
मुस्लिमांसाठी काहीतरी करुन शहीद होण्याचा विचार डोक्यात घेऊन त्याने थेट पॅलेस्टाईनला जाण्याचा विचार करत त्याने मुंबई गाठली. हा मुलगा घरातून निघून गेल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली असता मात्र तो कुठेच सापडत नसल्याने कुटुंबीयांनी पोलीस स्टेशन जाऊन मुलगा हरवला असल्याची तक्रार तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल केली होती.
पोलीस आणि युवकाचे मित्र व कुटुंबीय त्याचा शोध घेत असताना, या युवकाने आपल्या मित्राला फोन करून मी पॅलेस्टाईनला जात आहे, सध्या मुंबई येथे असून तुला माझ्याबरोबर यायचे असेल तर तूही मुंबईला ये असा निरोप पाठवला होता. या निरोपावरून शोध घेत कुटुंबीयांनी थेट मुंबई गाठत आपल्या मुलाला ताब्यात घेतले. त्याला पुन्हा अहमदनगरमध्ये परत आणले आहे.
दरम्यान, तोफखाना पोलिसांनी आता या प्रकरणाबाबत गांभीर्याने चौकशी सुरू केली असून मुलाचे समुपदेशन सुरू करण्यात आले आहे. तसेच पॅलेस्टाईनला निघालेला नगरमधील युवक कोणाच्या संपर्कात होता? याची माहितीही पोलिसांसह विविध गुप्तचर यंत्रणा घेत असून यासाठी या युवकाचे फेसबुक, इन्स्टाग्राम खाते तपासले जात आहे. अशी माहिती तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनंद कोकरे यांनी दिली आहे.