करमाळा: करमाळा शहरात मतदान प्रक्रिया सुरू असताना वीट गावात एका व्यक्तीच्या संशयास्पद मृत्यूची घटना उघडकीस आली असून परिसरात खळबळ उडाली आहे. मृत व्यक्तीचे नाव कचरू (मामासाहेब) विश्वनाथ खंडागळे (वय 52) असे आहे.

घटनेची माहिती मिळताच करमाळा पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. प्राथमिक तपासात मृतदेहावर कुठल्याही प्रकारचे जखमेचे किंवा मारहाणीचे खुणा आढळून आलेल्या नाहीत. तरीही अचानक झालेल्या मृत्यूमुळे संशय व्यक्त करण्यात येत आहे. काहींच्या मते हा गुदमरून किंवा गळा दाबून केलेला खून असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून एका संशयिताला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. मृत्यूचे नेमके कारण आणि घटनेमागील सत्य पोलिस तपासानंतर स्पष्ट होईल, अशी माहिती मिळाली आहे.








