Monday, September 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मुलीला त्रास देणाऱ्या जावयाला धावत्या बसमध्ये संपवलं; सासू-सासरे अटकेत; समोर आली धक्कादायक माहिती

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Friday, 27 September 2024, 12:37

कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. लग्नानंतर मुलीला वारंवार त्रास देत असणाऱ्या जावयाचा सासू-सासऱ्यांनी धावत्या एसटी बसमध्येच गळा आवळून खून केला. याप्रकरणी पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवली आणि मृत तरुणाच्या सासू-सासऱ्यांना बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. संदीप रामगोंडा शिरगावे (वय ३५) असे मृत तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी हणमंताप्पा यल्लाप्पा काळे (वय ४९) आणि सासू गौरा हणमंताप्पा काळे (वय ४५) या दोघांना अटक केली आहे. हे दोघेही आरोपी बेळगाव जिल्ह्यातील नायनगर येथील रहिवासी असल्याची माहिती मिळत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, बुधवारी रात्री १० वाजेच्या सुमारास पोलिसांना कोल्हापुरातील मध्यवर्ती बसस्थानकावर एका तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. तपासणी केल्यानंतर या तरुणाच्या गळ्यावर पोलिसांना दोरीचे व्रण दिसून आले. तेव्हा या तरुणाची हत्या झाल्याचा संशय पोलिसांना आला. मृताच्या खिशामध्ये एक डायरी आणि काही चाव्या आढळून आल्या आहेत. या डायरीत संदीप असे नाव लिहलं होते. तसेच पत्नीचा मोबाइल क्रमांक देखील नमूद होता. पोलिसांनी संदीपच्या पत्नीला घटनेची माहिती दिली आणि मृतदेह पुढील तपासणीसाठी सीपीआरमध्ये आणला.

मृताची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. तेव्हा त्यांना एक महिला आणि पुरुष बसस्थाकनाच्या बेंचवर काहीतरी ठेवताना दिसून आले. पोलिसांनी या दोन व्यक्तींचा शोध घेतला असता, ते मृत तरुणाचे सासू-सासरे निघाले. यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन्ही आरोपींना तात्काळ ताब्यात घेतले आहे. त्यानंतर दोन्ही आरोपींनी आपल्या गुन्ह्याची कबूली दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींच्या मुलीचा विवाह संदीपसोबत झाला होता. दारूचे व्यसन असल्याने तो पत्नीला सातत्याने त्रास द्यायचा त्यामुळे दोघांचा वर्षभरापूर्वी घटस्फोट झाला होता. त्यानंतर संदीपची पत्नी आपल्या माहेरी राहत होती. ४ दिवसांपूर्वी संदीपही तिच्या माहेरी गेला. तेथे सासू-सासऱ्यांनी त्याची समजूत घातली. परंतु, यावेळी संदीप आणि सासू सासऱ्यांमध्ये जोरदार वाद झाला.

 

संदीप ऐकण्याच्या मन:स्थितीत दिसत नसल्याने दोघांनीही त्याला कोल्हापुरात सोडून येतो, असे मुलीला सांगितले. आरोपींनी गडहिंग्लज ते कोल्हापूर प्रवासाची एस. टी. तिकिटे काढली. प्रवासात संदीप आणि आरोपींचा पुन्हा वाद झाला. या वादातून त्यांनी संदीपचा गळा आवळून खून केला. धक्कादायक बाब अशी की, बसमधील इतर प्रवाशांना याचा मागमूसही लागला नाही. दरम्यान, एसटी बस स्थानकावर पोहचल्यानंतर मुलगा आजारी आहे,, असं सांगून त्यांनी संदीपचा मृतदेह एका बेंचवर ठेवला. त्यानंतर त्यांनी घटनास्थळावरून पळ काढला.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

दुष्काळावर बोलताना विखेंची जीभ घसरली? ‘साधेपणाने लग्न करणाऱ्यांना मुलं झाली नाहीत का…..

Sunday, 27 September 2026, 23:11

‘छातीत दुखतंय…’ एवढंच म्हणाली अन् जीव गेला! आश्रमशाळेतील विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू,नेमकं घडलं काय?

Sunday, 27 September 2026, 22:06

दुष्काळी यादीत नाव नाही? शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; आता मिळणार दिलासा..

Sunday, 27 September 2026, 21:42

प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यूचं गूढ अखेर उकललं! पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये मोठा खुलासा

Sunday, 27 September 2026, 21:03

शरद पवार पुन्हा मैदानात! मुख्यमंत्री फडणवीसांना थेट पत्र; कोणत्या 17 मागण्यांचा उल्लेख?

Sunday, 27 September 2026, 20:44

पुण्यात 12 वर्षीय मुलीवर अत्याचार; 52 वर्षीय कंत्राटी कामगार पोलिसांच्या ताब्यात,सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक अन्…….

Sunday, 27 September 2026, 20:06
Next Post
Woman vandalized deputy CM devendra fadnavis office in mumbai

मोठी बातमी: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रालयातील कार्यालयाची अज्ञात महिलेकडून तोडफोड

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp