Solapur News : सोलापूर : सलगर खुर्द येथील सामाजिक कार्यकर्ते नागराज ज्ञानेश्वर व्हनवटे यांच्या मागणीला यश आले आहे. मंगळवेढा तालुक्यातील गावांमध्ये दुष्काळ घोषित करावा यासाठी सरकार दरबारी अनेक वेळा निवेदन देऊन दुष्काळ घोषित करण्याची मागणी नागराज ज्ञानेश्वर व्हनवटे यांच्याकडून करण्यात येत होती. त्यांच्या या मागणीची राज्य सरकारने दखल घेतली आहे. त्यांना यात यश आल्याने नागरिकांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
राज्य सरकारच्यावतीने ३१ ऑक्टोबर २०२३ रोजी खरीप हंगामात राज्यांतील ४० तालुक्यांना दुष्काळग्रस्त म्हणून घोषित केले होते. इतर १०२१ महसुली मंडळामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती घोषित करून सवलती जाहीर करण्याबाबत राज्य सरकारने दिनांक 10 नोव्हेंबरच्या मंत्रीमंडळ बैठकीत शासन निर्णय जाहीर केला. त्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सोलापूर जिल्ह्याचे पालक मंत्री चंद्रकांत पाटील यांचे आभार व्यक्त करण्यात आले.
सलगर खुर्द येथील सामाजिक कार्यकर्ते नागराज ज्ञानेश्वर व्हनवटे यांच्या पुढाकारातून दुष्काळ सदृश्य परिस्थिती घोषित करून सवलती जाहीर करण्यात याव्या यासाठी पुरवठा करण्यात आला. मंगळवेढे तालुक्यातील गावांचा समावेश करण्याबाबत जे निवेदन देण्यात आले होते, त्याचा विचार करून महाराष्ट्र राज्य सरकारच्यावतीने ४० तालुक्यांतील गावांना सवलती जाहीर करण्यात आल्या त्या यादीत १०२१ महसुली मंडळामध्ये दुष्काळ घोषित करण्यात आला त्याबद्दल राज्य सरकारचे गावकऱ्यांकडून आभार व्यक्त करण्यात आले आहे.