कोल्हापूर : कोल्हापूरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील गडमुडशिंगी गावामध्ये नृसिंह मंदिर विहिरीत कोसळून पुजाराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. कृष्णात उमराव दांगट असे पुजारचे नाव आहे. मंदिरामध्ये पूजा करत असतानाच मंदिर विहिरीमध्ये कोसळले आणि दुर्घटनेमध्ये कृष्णात उमराव दांगट यांचा मृत्यू झाला.
अधिक माहिती अशी की, विहिरीच्या काठावर छोटसं नृसिंह मंदिर होतं. गेल्या 20 ते 22 वर्षांपासून हे मंदिर असल्याचं माहिती समोर आली आहे. त्या मंदिरामध्ये नित्य नियमाने दांगट परिवार पूजा करत होते. दांगट परिवाराचे ते कुलदैवत असल्याने ते दररोज पूजा करत होते. मात्र, मंदिर विहिरीत कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली. दरम्यान पूजारी कृष्णात दांगट यांना बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू पथक घटनास्थळी दाखल झालं आहे. या घटनेनंतर गडमुडशिगी गावामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.