सातारा: सताऱ्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे मित्र-मैत्रिणीसोबत रंगपंचमी खेळताना टेंभू धरणात महाविद्यालयीन तरुणी बुडाल्याची घटना घडली आहे. ही घटना दुपारी 12 वाजेच्या सुमारास घडली. जुही घोरपडे असे या बुडालेल्या तरुणीचं नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कॉलेजमधील सहा तरुणांचा ग्रुप रंगपंचमी खेळत असताना ही दुर्घटना घडली आहे. मृत जुही हीचा मृतदेह सांगली जिल्ह्यातील खंबाळे गावात सापडला आहे. तिने नुकतीच बारावीची परिक्षा दिली होती. या घटनेमुळं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. ती नेमकी धरणात कशी पडली? व ही घटना कशी घडली याची अद्याप माहिती समोर आलेली नाही.
दरम्यान, या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आज(19 मार्च) रंगपंचमीच्या सणादिवशीच ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.