सोलापूर : ठाण्यातील मुंब्रामधील शिवसेनेच्या शाखेची पाहणी करण्याकरता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज ठाण्यात येत होते. त्यांच्या स्वागतासाठी ठाणे ते मुंब्रा या मार्गावर पोस्टर लावण्यात आले होते. मात्र उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याआधीच बॅनर फाडण्यात आल्याने ठाण्यात उद्धव गट आणि शिंदे गटात चांगलंच वातावरण तापलं आहे. या राड्यानंतर सोलापुरातील उद्धव ठाकरे गटाचे शिवसैनिक संतप्त झाले आहेत.(Sharad Kol)
उद्धव ठाकरे गटाचे महाराष्ट्र उपनेते शरद कोळी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदे गटावर सडकून टीका केली आहे. ते म्हणाले “तुम्ही रात्रीचे पोस्टर फाडता तर आम्ही शिवसैनिक तुम्हाला दिवसा फाडू..” असा इशारा शरद कोळी यांनी दिला आहे. ते पुढे बोलताना म्हणाले. “ज्या मुख्यमंत्र्यांच्या जीवावर हे सर्व काही केले आहे, त्यांची सत्ता आज ना उद्या जाणार आहे.” असा घणाघातही शरद कोळी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केला आहे.(Sharad Koli)
याबाबत अधिक माहिती अशी की, उद्धव ठाकरे आज ठाण्यातील मुंब्रा दौऱयावर येणार होते. यावेळी त्यांच्या स्वागतासाठी ठाणे ते मुंब्रा या दरम्यान पोस्टर लावण्यात आले होते. मात्र उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याआधीच यामधील जवळपास 90 टक्के पोस्टर फाडण्यात आले. यामुळे सोलापुरातील उद्धव ठाकरे गटाचे महाराष्ट्र उपनेते शरद कोळी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना आणि शिंदे गटातील शिवसैनिकांना जोरदार इशारा दिला आहे.
तुम्ही रात्रीचे पोस्टर फाडता, तर आम्ही शिवसैनिक तुम्हाला दिवसा फाडू असा घणाघात शरद कोळी यांनी केला. दरम्यान, शिंदे गटाच्या विरोधानंतरही शिवसेना ठाकरे गट प्रमुख उद्धव ठाकरे मुंब्र्यात दाखल झाले. यावेळी राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. या प्रकारामुळे आता ठाण्यात उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गट आमने सामने आले आहेत. (Uddhav Thackeray)