सोलापूर: राज्यात मराठा आरक्षण प्रकरणी मनोज जरांगे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे आमदार, खासदारांना मतदार संघात अडचणींचा सामना लागत आहे. आता याची झळ उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देखील बसली आहे. मराठा आंदोलकांचा अजित पवार यांच्यावर रोष आहे. माढ्यातील पिंपळनेर कारखाना कार्यक्रमासाठी अजित पवारांना येण्यास तेथील आंदोलकांनी विरोध केला आहे. सकल मराठा समाजाने अजित पवारांच्या प्रवेश बंदीची घोषणा देखील केली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे 23 ऑक्टोबरला माढा येथे आमदार बबनदादा शिंदे यांच्या पिंपळनेर साखर कारखान्यावर कार्यक्रमासाठी येणार आहेत. मात्र, सकल मराठा समाजाने पवार यांना येऊ देणार नाही, असा इशारा दिला आहे. माढा पोलिसांकडे तसा अर्ज देखील दिला आहे. विशेष म्हणजे याच दिवशी माढा तालुक्यातील कापसेवाडी येथे राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या बैठकीसाठी येत आहेत.
हेही वाचा:
Daund News : दौंड नगरपरिषदेच्या प्रकल्प अभियंत्यास दहा हजारांची लाच घेताना अटक
Pune News : ललित पाटीलच्या दोन मैत्रिणींना नाशिकमधून अटक; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश होणार?