नशिक: शहरातुन धक्कादायक घटना समोर येत आहे. शहरातील उड्डाणपुलावर रविवारी रात्रीच्या सुमारास टेम्पोचा भीषण अपघात झाला होता. या घटनेत सात जन मृत झाले आहेत.आता या अपघाताबाबत खळबळजनक माहिती समोर आली आहे. या प्रकरणात टेम्पो चालक बेजबाबदार होऊन गाडी चालवत होता. यामुळे एका तरूणाने टेम्पोतून खाली उतरणे पसंत केले होते. याच तरूणाने आता अपघात कसा घडला? याबाबत खुलसे केले आहेत. संपूर्ण घटनाक्रम या तरुणाने सांगितला आहे. विचारपूस केली असता टोल चुकवण्यासाठी मार्ग बदलल्याचे समोर आले आहे. यामुळे आठ जीव गमवावे लागले आहेत.
या बाबत अधिक माहिती अशी की, नाशिकमधील सिडकोच्या सह्याद्रीनगर परिसरातील रहिवाशी निफाड तालुक्यातील धारणगाव येथे एका कार्यक्रमाला गेले होते. हा कार्यक्रम आटोपून परत येताना त्यांच्या पिकअपला शहरातील द्वारका उड्डाणपूलावर भीषण अपघात झाला होता. याच गाडीतून विक्रांत नावाचा एक मुलगा प्रवास करीत होता. त्याने सांगितले की वाहनचालक नीट गाडी चालवत नव्हता. या मुलाने गाडीतून उतरून दुसऱ्या गाडीतून प्रवास करणे पसंत केले होते.त्यामुळेच या अपघातातून त्याचा जीव वाचवला आहे.
चालकाने बेजबाबदारपणे गाडी चालवली?
विक्रांत म्हणाला की, कार्यक्रम आटोपल्यानंतर आम्ही सायंकाळी साडेपाचला घराच्या दिशेने परत निघालो होतो. यावेळी चालक अत्यंत वेगाने आणि बेजबाबदारपणे गाडी चालवत होता, इतर तरुण मौज मजा करत होते. त्यावेळीच मी त्याला गाडी नीट चालवण्यास सांगितले होते. नाहीतर टेम्पो बाजूला घे, मी चालवतो असा सल्ला दिला होता.पण त्याने माझे ऐकले नाही, असे विक्रांत म्हणाला.
टोलचे केवळ एकशे पस्तीस रूपये वाचवण्यासाठी त्यांनी मार्ग बदलला
या प्रवासा दरम्यान एका तरुणाने टोल चुकविता यावा याकरीता सय्यद पिंपरीमार्गे जाऊ असा सल्ला चालकाला दिला होता. पण टोलचे केवळ एकशे पस्तीस रूपये वाचवण्यासाठी त्यांनी मार्ग बदलला. त्यानंतर चालक गाडीचा वेग कमी करीत नसल्याने आडगाव परिसरात मी गाडीखाली उतरलो. आणि दुसऱ्या लोकांनाही खाली उतरा असे म्हणालो होतो.मात्र थोडेच अंतर बाकी असल्याचे त्यांनी संगत याच गाडीतून आपण जाऊ असं इतर म्हणाले. त्यानंतर पुढे जाऊन ही अपघाताची भयावह घटना घडली आहे.
अधिक माहिती अशी की, घडलेल्या अपघातात उड्डाणपुलावरून नादुरस्त झालेल्या टेम्पोच्या मागील बाजूकडून`10 फुट लोखंडी सळ्या बाहेर आल्या होत्या. या सळ्यांना रेडीअम आणि लाल कापडही लावून झकलेले नव्हते. लोखंडी सळ्या वाहणाच्या काचा फोडून आत शिरल्या होत्या. या प्रकरणात आता टेम्पो चालक, मालक आणि सळई पुरवठादार अशी तीन जणांविरोधात शहरातील भद्रकाली पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील दोघांना अटककेली असून वहान चालक फरार आहे.