करमाळा (सोलापूर) : मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.रामदास झोळ यांनी अंतरवाली सराटी येथे जाऊन सदिच्छा भेट घेतली. यावेळी 7 ऑगस्ट रोजी सोलापूर मध्ये होणाऱ्या मराठा समाजाच्या होणाऱ्या शांतता रॅलीचे निमंत्रण जिल्ह्यातील मराठा समाजाच्या वतीने मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांना देण्यात आले. या भेटीदरम्यान मराठा समाज यासह बहुजन समाजाच्या विद्यार्थ्यांना नोकरी, शिक्षण व आरक्षणांमधील सध्या उद्भवत असलेल्या अडचणींविषयी चर्चा करण्यात आली. यामध्ये
1) सामान्य प्रशासन विभागाने जात पडताळणी बाबत काढलेल्या शासन निर्णय यामध्ये फक्त SEBC विद्यार्थ्यांना सहा महिन्याची मुदत दिलेली आहे, ती सरसकट सर्व मागासवर्गीय जातींना देण्यात यावी.
2) बहुजन समाज कल्याण विभागाने 14 जून 2024 रोजी काढलेला शासन निर्णय SEBC, EWS व OPEN च्या विद्यार्थ्यांसाठीही लागू करावा. (1554 अभ्यासक्रमाबाबत).
3) केंद्र सरकारचे EWS आरक्षण SEBC च्या विद्यार्थ्यांना देखील शिक्षणासाठी लागू करावे.
4)OBC च्या विद्यार्थ्यांना वस्तीगृह भत्ता डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह भत्याप्रमाणे सरसकट लागू करावा.
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रवींद्र गोडगे, गणेश मंगवडे, प्रशांत नाईकनवरे, निलेश शिंदे, सुहास काळे पाटील, भीमराव ननवरे आदीजन उपस्थित होते.