Friday, October 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

आधी दबाव, धमक्या अन् कबुलीचा व्हिडिओ? 19 वर्षीय सृष्टीच्या मृत्यूनंतर रेक्टरला अटक

Shreya Varkeby Shreya Varke
Wednesday, 9 September 2026, 11:45

सातारा: साताऱ्यातील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या वसतिगृहात 19 वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्यानंतर या प्रकरणाला गंभीर वळण मिळाले आहे. सातारा शहर पोलिसांनी वसतिगृहाच्या रेक्टर जयश्री जकाते यांना अटक केली आहे. याशिवाय महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. टी. साळुंखे आणि हॉस्टेल समितीतील अन्य सदस्यांविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मृत विद्यार्थिनी सृष्टी भानुदास बिरामणे हिने वसतिगृहातील काही सुविधांबाबत आक्षेप घेतला होता. विशेषतः शौचालयाच्या समस्येबाबत तिने आवाज उठवला आणि त्यासंदर्भात व्हिडिओ तयार केल्याचे तिच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे. यानंतर तिला मानसिक त्रास देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

2 सप्टेंबर रोजी सृष्टीने वसतिगृहाच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी घेतली. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी तपास केला असता तिच्या हस्ताक्षरातील चार ओळींची चिठ्ठी मिळाल्याचे सांगण्यात आले. या चिठ्ठीत तिने वसतिगृहात होत असलेल्या दबावाचा उल्लेख केल्याचा दावा करण्यात आला आहे.

सृष्टीच्या वडिलांनी पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत गंभीर आरोप केले आहेत. रेक्टर आणि हॉस्टेल समितीतील काही व्यक्तींनी तिच्यावर दबाव टाकला. तिच्याकडून जबरदस्तीने कबुलीचा व्हिडिओ तयार करून घेतला आणि महाविद्यालयातून हाकलून देण्याची तसेच पोलिसांत तक्रार करण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.

 

या प्रकाराची माहिती असतानाही प्राचार्यांनी योग्य हस्तक्षेप केला नाही, असा आरोपही विद्यार्थिनीच्या वडिलांनी केला आहे. त्यानुसार पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली संबंधितांविरोधात गुन्हा नोंदवला आहे.

दरम्यान, रेक्टर जयश्री जकाते यांना निलंबित करण्यात आले असून त्या पोलीस कोठडीत आहेत. प्राचार्य डॉ. साळुंखे यांना चौकशी पूर्ण होईपर्यंत सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. प्रकरणातील इतर संबंधितांना चौकशीसाठी पोलिसांसमोर उपस्थित राहण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

पोलिसांकडून या प्रकरणातील सर्व बाजू तपासल्या जात आहेत. तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने वसतिगृहाच्या इमारतीला संरक्षक जाळी बसवण्याचे काम प्रशासनाने सुरू केले आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

आई घराबाहेर गेली अन् संधी साधली! लोहगावात साडेचार वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार; 20 वर्षीय तरुणाला अटक

Friday, 2 October 2026, 10:06

पोलिसांची टोपी घातली अन् ‘मी इथला’ म्हणत कॅब चालकाला धमकावलं; पुण्यात तोतया पोलिसाचा पर्दाफाश

Friday, 2 October 2026, 9:28

कोकणातलं पुराचं पाणी दुष्काळी भागात पोहोचणार? महाराष्ट्रात ‘वॉटर लिंक टनेल’ची चर्चा; नेमकं काय होणार? जाणून घ्या

Friday, 2 October 2026, 8:51

8.57 लाख कोटींची गुंतवणूक अन् 2.91 लाख रोजगार! महाराष्ट्रासाठी इन्व्हेस्टमेंट समिटमध्ये मोठी घोषणा

Friday, 2 October 2026, 8:27

देवीची मूर्ती आणली अन् परतीच्या वाटेत अनर्थ! समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातात 7 जणांचा मृत्यू

Friday, 2 October 2026, 8:18

मतदाराचं नाव ‘बॉम्बस्फोट’, वडिलांचं नाव ‘बॉम्ब’! पुणे शिक्षक मतदार यादीत अजब नोंद

Friday, 2 October 2026, 8:09
Next Post

‘अति तिथे माती’ लोणी काळभोर पोलिस ठाण्यातील एपीआय ५० हजारांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात! ‘आणखी दोन कर्मचारी बाबरचेच चेले?’

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp