Saturday, June 13, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

फोटोग्राफर तरुणीसह तिच्या मैत्रिणीला हॉटेलमध्ये डांबलं; पिस्तुलाचा धाक दाखवत शरीरसुखाची मागणी

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Saturday, 27 September 2025, 16:58
Photographer arrested a young woman and her friend in a hotel; demanded physical pleasure at gunpoint

Photo-Social Media

नाशिक : नाशिक शहरातील (Nashik Crime) म्हसरूळ परिसरात एका व्यावसायिक फोटोग्राफर तरुणी आणि तिच्या मैत्रिणीला एका हॉटेलमध्ये जबरदस्तीने डांबून (Nashik News) पिस्तुलाचा धाक दाखवत अनैतिक व्यवसाय करण्याबाबत सांगितल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात हॉटेलचालकासह त्याच्या साथीदाराविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सुमारे चार महिन्यांपूर्वी घडलेल्या घटनेत सुरुवातीला पीडित तरुणीने भीतीपोटी तक्रार दाखल केली नव्हती. मात्र, आरोपीकडून पुन्हा धमक्या मिळाल्यानंतर तिने अखेर पोलिसांकडे धाव घेतली. तत्काळ कारवाई करत संशयित हॉटेल चालक सौरभ संजय देशमुख आणि त्याचा साथीदार वेटर मोहीत मिलिंद ताम्हाणे यांना अटक करण्यात आली. नाशिक जिल्हा न्यायालयाने दोघांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

सौरभ देशमुख याचे ‘कॅटल हाउस’ हॉटेल असून, यापूर्वीही त्याच्यावर बेकायदेशीर कृत्यांबाबत कारवाई झाली आहे. विशेष म्हणजे देशमुख हा एका निवृत्त पोलिस अधिकाऱ्याचा मुलगा आहे. पोलिसांच्या माहितीप्रमाणे, हॉटेलमध्ये अनेकदा अनैतिक व गैरकायदेशीर व्यवहार होत असल्याच्या तक्रारी होत असल्याने तो आणि त्याचे कर्मचारी वैयक्तिक वॉकी-टॉकी वापरत होते.

 

तपासात समोर आले की, पीडित तरुणी आणि तिच्या मैत्रिणीचा वेटर मोहीत ताम्हाणेशी पूर्वीपासूनच परिचय होता आणि 2020 पासून आर्थिक मदत घेतली जात होती. एके दिवशी त्यांना माहिती मिळाली की मोहीत ‘कॅटल हाउस’ हॉटेलमध्ये आहे. त्यावेळी त्या दोघी आणि त्यांचा मित्र हॉटेलमध्ये गेले. सौरभ देशमुख यांनी त्यांना धमकावून म्हटले, “तुम्ही येथे येऊन मोठी चूक केली आहे. माझ्या हॉटेलमध्ये कॉलगर्ल्स पुरवल्या जातात, तुम्ही दोघीही तेच काम करा. चांगले पैसे देतील, मोहीतकडून पैसे मागण्याची गरज नाही,” असे सांगितले.

तिघांनी पळण्याचा प्रयत्न केला, पण देशमुख यांनी पिस्तुलाचा धाक दाखवत त्यांना बंद खोलीत डांबून ठेवले आणि जिवे मारण्याची धमकी दिली. त्यांच्या जवळील 21 हजार रुपये देखील त्यांनी काढून घेतले. अखेर पहाटे साडेपाचच्या सुमारास त्यांना सोडण्यात आले.

काही दिवसांनी मोहीत ताम्हाणे यांनी व्हॉट्सॲपवरून पुन्हा धमकीचे मेसेज पाठवले. त्यानंतर पीडित तरुणींनी पोलिसांत धैर्य दाखवून तक्रार दाखल केली. या प्रकरणी विनयभंग, जबरदस्ती, डांबून ठेवणे, दरोडा, धमकी देणे अशा गंभीर कलमांन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. प्राथमिक तपासात संशयितांवर पूर्वीही असेच आरोप असल्याचे स्पष्ट झाले आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुरंदर विमानतळाचा मार्ग मोकळा! भूसंपादनासाठी 30 जूनपर्यंत मुदतवाढ; 70 टक्के शेतकऱ्यांची संमती

Saturday, 13 June 2026, 18:13

प्लास्टिकच्या एक किलो कचऱ्याच्या बदल्यात ‘साखर’ तर विद्यार्थ्यांना मिळणार ‘शालेय वस्तू; उरुळी कांचनमध्ये ‘ड्रीम्स युवा सोशल फाउंडेशन’चा अनोखा पॅटर्न

Saturday, 13 June 2026, 17:42

सक्षमचं घर का सोडलं? खरं कारण सांगत आंचलचा सक्षमच्या लहान भावावर गंभीर आरोप; म्हणाली “लहान भाऊ माझ्याशी गैरवर्तन…..

Saturday, 13 June 2026, 17:37

जन्मदात्रीनेच घेतला जीव! चार मुलांना विष पाजून आईने संपवली जीवनयात्रा; तिघांचा दुर्दैवी मृत्यू

Saturday, 13 June 2026, 16:36

Pune Weather: ‘एल निनो’चे पुण्याच्या पावसावर सावट! यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज; प्रशासनाची धावपळ

Saturday, 13 June 2026, 15:52

पिंपरीतील धक्कादायक प्रकार! लिफ्टमध्येच केला किळसवाणा प्रकार; जाब विचारल्याच्या रागातून जोडप्यावर अल्पवयीन मुलाकडून चाकूहल्ला…

Saturday, 13 June 2026, 15:14
Next Post
Sonam Wangchuk: Sonam Wangchuk's relationship with Pakistani officials? Ladakh DGP's big statement

सोनम वांगचुक यांचा पाकिस्तानी अधिकाऱ्यांशी संबंध? लडाख डीजीपी यांचं मोठं वक्तव्य 

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.