सातारा : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सातारा दौऱ्यावर होते. फलटण तालुक्याला 23 वर्षांनी हक्काचं पाणी मिळतंय, अनेक प्रकारच्या चोऱ्या पाहिल्या, पण पाण्याची चोरी पाहिली नव्हती, असं फडणवीस म्हणाले. फलटणमध्ये ते बोलत होते. मी राज्याचा गृहमंत्री असल्यानं चोरी केलेल्याला पकडण्याचे काम माझ्या खात्याचे आहे, त्याला आम्ही पकडूच, असे बोलत त्यांनी पवार कुटूंबाचे नाव न घेता टीका केली.
नेहमी लोकं उन्हात आणि नेते सावलीत असतात पण आज नेते आणि लोकं दोन्ही उन्हात आहेत. ज्याला दुष्काळी म्हटले त्याचा डाग मिटण्याचे काम करणार आहोत, आज हक्काचे पाणी मिळणार आहे. आज फलटणमध्ये रामायणाचा नवा अध्याय सुरू करत आहोत. नरेंद्र मोदींच्या राज्यात नवीन अध्याय सुरू होतो आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
बळीराजा योजना
आज 23 वर्षांनी पाणी तुम्हाला मिळते आहे. हे काम जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत पैशाची चणचण भासणार नाही. संगोळ्याला पाणी मिळाले त्यामुळे लोकांचे वय वाढते पण शहाजी बापूचे वय कमी व्हायला लागले ते स्मार्ट दिसायला लागले आहेत. मोदींना भेटून सांगितले की आमच्या शेतकऱ्यांसाठी योजना द्या त्यांनी बळीराजा योजना दिली. गेल्या 13 महिन्यात आपण 8 योजनांना मान्यता दिली. मी देखील दुष्काळी भागातून येतो, त्यामुळे याचे दुःख मला माहिती आहे, देवेंद्र फडणवीस म्हणाले.
पुराचे पाणी कुणाच्या मालकीचे नाही
पुराचे पाणी कुणाच्या मालकीचे नाही म्हणून त्यावरून आम्ही योजना करण्याची आखली. हे दुष्काळी भागाकडे वळवले तर मोठा फायदा होईल. 3300 कोटींचा प्रकल्प आहे त्याला केंद्र सरकारने तत्वतः मान्यता दिली आहे. पुराचे पाणी शहरात घुसणार नाही त्याचा फायदा 10 लाख कुटुंबातील लोकांना होणार आहे. 4 लाख हेक्टर जमीन ओलिताखाली यावी हा प्रयत्न आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
रोजगाराच्या संधी प्राप्त
रस्त्याच्या जाळ्यात देशात आठवा मतदारसंघ माढाचा प्रश्न होता. रेल्वे तयार होती पण चालली नाही कुणी अडवली माहीत नाही. आपण नवीन कॉरिडॉर करतो आहोत, त्यामुळे रोजगार इथे येणार आहेत. या भागात उद्योग आणण्याचे काम करतो आहे. रोजगाराच्या संधी प्राप्त होणार आहे. जे काम करतात त्यांना आशीर्वाद द्या, आम्ही या नेत्यांच्या पाठीशी आम्ही भक्कमपणे उभे आहोत. दुष्काळ संपवण्यासाठी आंदोलन सुरू झाले आहे. शेतीच्या बांधावर पोहचवणार तोपर्यंत शांत बसणार नाही, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.