मुंबई : मध्य रेल्वेने मुंबई- कोल्हापूर एक्स्प्रेस डब्यांमध्ये कायमस्वरूपी अतिरिक्त डबे जोडण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये ट्रेन क्रमांक ११०२९/३० छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई – श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर एक्स्प्रेसमध्ये २ अतिरिक्त शयनयान डबे आणि १ अतिरिक्त सामान्य द्वितीय श्रेणी डबा वाढ होणार आहे. यामध्ये २५ जूनपासून कोल्हापूर येथून, तर २८ जूनपासून मुंबई येथून ही वाढ केली जाणार आहे.