अहमदनगर : बारामती लोकसभा निवडणुकीप्रमाणेच अहमदनगरमध्ये भारतीय जनता पक्षाने पैसे वाटल्याचा आरोप शरदचंद्र पवार पक्षाकडून करण्यात आला आहे. भारतीय जनता पक्षाचे पारनेर तालुकाध्यक्ष राहुल शिंदे यांचा पैसे वाटतानाच व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओची सखोल तपासणी करून संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी करण्यात येत आहे. दक्षिण अहदनगरमधील महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार निलेश लंकेंनी हा पैसे वाटतानाचा व्हिडीओ आपल्या सोशल मीडिया हँडलवर शेअर केला आहे
निलेश लंके यांनी सोशल मिडीयावर तीन व्हिडीओ शेअर केले आहे. पहिल्या व्हिडीओमध्ये भारतीय जनता पक्षाचे पारनेर तालुकाध्यक्ष राहुल शिंदे पैसे वाटताना व्हिडीओ दिसत आहेत. निलेश लंके म्हणाले, बारामतीसारखी पैसे वाटपाची पुनरावृत्ती अहमदनगर लोकसभा क्षेत्रात सुद्धा भाजपने कायम ठेवली. परंतु या धनशक्तीला जनशक्ती पुरून उरणार. भाजपा पारनेर तालुकाध्यक्ष राहुल शिंदे याला पैसे वाटतानाच्या या व्हिडीओची शहानिशा करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी.
भारतीय जनता पक्षाचे पारनेर तालुकाध्यक्ष राहुल शिंदे यांचे कार्यकर्ते आणि निलेश लंके यांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. तिथे पैशाने भरलेली बॅग रस्त्यावर पडल्याचे व्हिडिओ प्रमाणात व्हायरल झाले आहेत. संबंधित पैसे मतदारांना वाटण्यासाठी आणले असल्याचा आरोप निलेश लंके यांच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. तर काही महिलांनी आपल्या गाडीवर हल्ला केल्याचा आरोप राहुल शिंदे यांनी केला. याप्रकरणी पारनेर पोलसांकडून अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. पारनेर तालुक्यातील वडझिरे गावात ही घटना घडली आहे.
हीच का तुमची दोन दिवसाची यंत्रणा?
पारनेर भाजपा तालुकाध्यक्ष राहुल शिंदे यांना सुजय विखे पाटील यांचे वडझिरे येथे पैसे वाटताना रंगेहात पकडले.. आता तुम्ही ठरवा तुम्हाला चार-पाचशे रुपये देऊन तुमचा लोकशाहीचा अधिकार विकत घेणारा खासदार हवा का विकास करणारा, सामान्यांसाठी लढणारा हवा?… pic.twitter.com/XdJevKZnXb— Nilesh Lanke – निलेश लंके (@Nilesh_LankeMLA) May 12, 2024
महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके म्हणाले, ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी आहे. दक्षिण अहमदनगरमध्ये विखे परिवाराकडून पैशांचा अक्षरशः पाऊस पडला आहे. या निवडणुकीत सत्तेचा गैरवापर प्रमाणावर झाला आहे. परंतु. दक्षिण अहमदनगर लोकसभेतील जनता स्वाभिमानी आहे, ती भारतीय जनता पक्षाच्या पैशांच्या मोहाला आणि दमदाटीला अजिबात बळी पडणार नाही. आता भाजपला आपला पराभव समोर दिसत आहे, त्यामुळे या गोष्टी घडत आहेत, असंही निलेश लंके यांनी म्हटलं आहे.
बारामतीसारखी पैसे वाटपाची पुनरावृत्ती अहमदनगर लोकसभा क्षेत्रात सुद्धा भाजपने कायम ठेवली. परंतु या धनशक्तीला जनशक्ती पुरून उरणार. भाजपा पारनेर तालुकाध्यक्ष राहुल शिंदे याला पैसे वाटतानाच्या या व्हिडीओची शहानिशा करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी.@DGPMaharashtra @ECISVEEP… pic.twitter.com/7UFEa2Dbna
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) May 12, 2024