कोल्हापूर : कोल्हापूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अंथरुणात लघुशंका केल्याच्या रागातून सावत्र आईने 5 वर्षाच्या मुलीला उलथनं तापवत गुप्तांगासह गाल, ओठ आणि गळ्याजवळ चटके दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कोल्हापूरच्या हातकणंगले तालुक्यातील कासारवाडी येथे हा संतापजनक प्रकार घडला आहे.
शुक्रवारी दुपारी १२ च्या सुमारास सावत्र आईने या चिमुकलीला चटके दिले. उलथन्यानं चटके दिल्यामुळे मुलीचा चेहरा गंभीर भाजला आहे. ही घटना घडली तेंव्हा मुलीचे वडील घरात नव्हते. हा प्रकार समजताच मुलीचे वडील शुभम मगरे यांनी शिरोली पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पूजा मगरे हिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सावत्र आईनं चिमुकलीला दिले डाग!
मिळालेल्या माहितनुसार, कोल्हापूरच्या हातकणंगले तालुक्यातील कासारवाडीमध्ये सावत्र आईनं पाच वर्षाच्या चिमुकलीला अंथरुन ओलं केल्याच्या रागातून गरम उलथन्यानं डाग दिले आहेत. शुक्रवारी दुपारी १२ च्या सुमारास ही घटना घडली आहे. शुभम मोकिंदराव मगरे हे त्यांच्या दुसऱ्या पत्नीसह आणि दोन मुलांसह कासारवाडी येथे भाडेकरू म्हणून राहतात. शुभम व पुजा यांचे दुसरे लग्न झाले असून दोघांनाही पहिल्या लग्नापासून आपत्य आहेत. शुभम कामानिमित्त बाहेर गेले असता पुजा मगरे यांनी पाच वर्षाच्या मुलीला अंथरुणावर लघुशंका केली म्हणून उलथने तापवत चटके दिले आहेत. या घटनेने संपूर्ण शहर हादरलं आहे.
मुलीच्या चेहऱ्यावर, अंगावर जखमा..
पाच वर्षाच्या या चिमुकलीनं अंथरुण ओलं केल आणि याचा राग येऊन पूजा मगरे यांनी उलथने तापवत मुलीच्या गालावर, ओठांवर, तोंडावर, गळ्याजवळ गुप्तांगाजवळ उलथने तापवुन चटके दिले आहेत. यावेळी या मुलीचे वडील घरात नव्हते. उलथन्यानं पोळवल्यामुळं मुलीच्या चेहऱ्यावर, अंगावर जखमा झाल्या आहेत. हे पाहिल्यावर मुलीच्या वडीलांनी शुभम मगरे यांनी शिरोली पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पूजा मगरे हिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.