मंगळवेढा : विरोधी पक्षाच्या दबाव तंत्रामुळे मंगळवेढा उपसा सिंचन योजना मंजूर झाली आहे. तालुक्यातील दुष्काळी 35 गावापासून मी दौरा सुरू केला होता. विधानसभेतही आवाज उठवला होता, अशी माहिती आमदार प्रणिती शिंदे यांनी दिली आहे. सोलापूर लोकसभेच्या कॉंग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी आज रविवारी अनवली, एकलासपूर, सिद्धेवाडी यासह पंढरपूर तालुक्यात गावभेट दौरा केला. यावेळी त्यांनी पत्रकारांशी सवांद साधला.
प्रणिती शिंदे म्हणाल्या कि, मंगळवेढा उपसा सिंचन योजना कागदोपत्री होती. त्याला सुशीलकुमार शिंदे आणि भारत भालके यांनी मान्यता दिली होती. मात्र, ती मान्यता मिळाली नव्हती. मंगळवेढा तालुक्यात गाव भेट दौरा केला. त्याचबरोबर विधानसभेत आवाज उठवला. एकंदरीत विरोधी पक्षाच्या दबावतंत्रामुळे योजना मंजूर झाल्याचे आमदार प्रणिती शिंदे यांनी सांगितले.
त्याचबरोबर भीमा नदीकाठच्या गावांना चार तास वीज पुरवठा करण्यात येत होता. याबाबत पाठपुरावा करून नदीकाठच्या शेतकऱ्यांना 6 तास वीज पुरवठा केला. तसेच पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील कायमस्वरूपी पाण्याचा प्रश्न मिटला पाहिजे. तीव्र उन्हाळा होण्याआधी उजनीच्या पाण्याचे नियोजन योग्य झाले पाहिजे. उजनीच्या नियोजनाबाबत बैठकीला कोणत्याही आमदाराला विश्वासात घेतले जात नाही. त्यामुळे नियोजनाअभावी शेतकऱ्यांना उजनीचे पाणी मिळत नसल्याचे शिंदे म्हणाल्या.
सोलापूरसाठी काहीही देऊ शकले नाही हे दुर्दैव
सत्ता त्यांची, पंतप्रधान त्यांचे, सगळे मंत्री त्यांचे एवढे थाटामाटात सत्तेवर आले, मात्र सोलापूरसाठी काहीही देऊ शकले नाही. हे सोलापूरचे दुर्दैव आहे. लोकांचा वापर करून ते सत्तेत आले. आज त्यांना त्यांची गरज असताना ते त्या लोकांसोबत उभे राहत नाहीत, असंही आमदार प्रणिती शिंदे यांनी सांगितले.
लोकशाही वाचवण्यासाठीची ही लढाई
लोकशाही वाचवण्यासाठी ची ही लढाई आहे. भाजपचे काही खासदार संविधान आम्हाला बदलायचे आहे, असं ऑन रेकॉर्ड म्हणाले आहेत. दरम्यान, महाविकास आघाडी लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आणि संविधान जसेच्या तसे ठेवण्यासाठी लढाई लढतोय भाजप आमचा शत्रू असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव काळुंगे सर, जिल्हाध्यक्ष नंदकुमार पवार, शिवसेवा ठाकरे गटाचे संभाजीराव शिंदे, सुधीर भाऊ अंभगराव, जयवंत माने, बंडू घोडके, पूनम ताई अंभगराव, साक्षी भिसे, मंगेश बोरोडे, संगिता ताई पवार, पूर्वा ताई पांढरे, अरूण जाधव, गोकूळ जाधव, राष्ट्रवादीचे नागेश फाटे संदिप पाटील, अमर सूर्यवंशी, शंकर सुरवसे आदि पदाधिकारी कार्यकर्त मोठ्या उपस्थित संख्येने उपस्थित होते.