लहू चव्हाण
पाचगणी : उद्यापासून सुरु होणाऱ्या ‘आय लव्ह पाचगणी’ फेस्टिवलच्या पार्श्वभूमीवर पर्यटन नगरी पाचगणीची बाजारपेठ रंगीबेरंगी दिव्यांनी सजली आहे. महोत्सवात रंग भरणाऱ्या विविध कलाविष्कारांची तयारी पूर्ण झाली आहे. फेस्टिवलला राजकीय दिग्गज, मराठी व हिंदी चित्रपट सृष्टीतील अभिनेते, अभिनेत्री यांची उपस्थिती हे महोत्सवाचे खास आकर्षण आहे.
पाचगणी शहराची स्वतंत्र ओळख निर्माण व्हावी, शहराच्या नावलौकिकात भर पडावी, पर्यटकांचा ओघ या शहराकडे वाढावा, त्याचबरोबर स्थानिक भूमिपुत्रांनाही व्यवसायाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात हा सर्वांगीण उद्देश डोळ्यासमोर ठेवून ‘आय लव्ह पाचगणी फेस्टिवल’साठी पाचगणीकर एकत्र आले असून, १ ते ३ डिसेंबर दरम्यान हे फेस्टिवल होत आहे. या महोत्सवास चित्रपट क्षेत्रातील अभिनेते भाऊ कदम, श्वेता शिंदे हिंदी चित्रपट क्षेत्रातील गीता कपूर, नृत्यदिग्दर्शिका फुलवा खामकर यांची उपस्थिती हे महत्त्वाचे आकर्षण ठरणार आहे. मंगेशकर घराण्यातील गायिका राधा मंगेशकर यांच्या सुमधुर गायनाने ही संगीत संध्या रंगणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ग्रामीण विकास मंत्री गिरीश महाजन, कोल्हापूरचे राजे छत्रपती संभाजी राजे, खासदार उदयनराजे भोसले, पालकमंत्री शंभूराजे देसाई, आमदार मकरंद पाटील, विक्रम पावसकर, धैर्यशील कदम, मंत्री, पदाधिकारी, शासकीय अधिकारी यांची उपस्थिती महत्वपूर्ण ठरणार आहे.
या कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन या वेळी फेस्टिवलचे अध्यक्ष शिवाजी शिंदे, उपाध्यक्ष शॉरम जवानमर्दी, सचिव किरण पवार, जाँ. सचिव मुराद खान, खजिनदार निहाल बागवान, माजी अध्यक्ष राजेंद्र भगत, भारत भाई पुरोहित, राजेंद्र पारठे, नितीन भाई भिलारे, आदित्य गोळे, मेहुल पुरोहित, जयवंत भिलारे, राजेश पारठे, नितीन कासूर्डे, सुनील कांबळे, अजगर अली, भूषण बोधे, स्वप्नील परदेशी यांनी केले आहे.