Friday, September 11, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Maratha Reservation: कोल्हापूर जिल्ह्यातही कुणबी नोंदी सापडल्या, मराठवाड्यापेक्षा जास्त नोंदी मिळण्याचा अंदाज!

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Thursday, 9 November 2023, 15:08
Maratha community meeting for shanatata rally in antarvali sarati Jalna

Maratha Reservation : कोल्हापूर : राज्य सरकारचा महसूल विभाग कुणबी नोंदी शोधण्यासाठी कामाला लागला आहे. प्रशासकीय स्तरावर कुणबी नोंदी शोधण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषदेसह महापालिक स्तरावर देखील हे काम सुरू आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात, तर स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे. आरक्षणाचा पाया रचला त्या छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या कोल्हापूरमध्ये जिल्हा प्रशासनाकडे आत्तापर्यंत विविध विभागांतील ५ हजार ५६६ नोंदी मिळाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने जिल्हा माहिती कार्यालयाकडून दिली आहे.

कोल्हापूर जिल्हा प्रशासनाकडून कुणबी नोंदी शोधण्यासाठी जोरदार मोहिम सुरु आहे. या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यात ५ हजार ५६६ नोंदी सापडल्या आहेत. सर्वाधिक ११८५ नोंदी कागल तहसील कार्यालयाकडून झाल्या आहेत. राज्य सरकारने नेमलेल्या समितीच्या पहिल्या अहवालाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी राहुल रेखावार आणि निवासी उपजिल्हाधिकारी संतोष तेली यांच्या मार्गदर्शनाखाली अभिलेख शोधण्याचे काम वेगाने सुरू आहे. यासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन केला आहे. सर्वाधिक नोंदी या कागल व करवीर तालुक्यातील आहेत. दरम्यान, सुरुवातालीच हजारो नोंदी सापडल्याने मराठवाड्यापेक्षा जास्त नोंदी कोल्हापूर जिल्ह्यात आढळतील, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील कुणबी, मराठा कुणबी व कुणबी मराठा या नोंदी तपासण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात “विशेष कक्ष” स्थापन करण्यात आला आहे. तसेच उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय समित्यांची स्थापना केली आहे. निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली हे या कक्षाचे समन्वय अधिकारी आहेत. तलाठी, कोतवाल, अन्य कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी, ऑपरेटर यासह जेलचे पोलीस कर्मचारी, जिल्हा उपनिबंधक कार्यालयाचे कर्मचारी, अंशकालीन कर्मचारी अशा वेगवेगळ्या गटातील सर्व कर्मचारी सध्या कुणबी नोंदीचा शोध घेत आहेत. त्यासाठी सर्व रेकॉर्ड तपासून पाहिले जात आहे.

नियुक्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कुणबी नोंदीला प्राधान्य देण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहे. दरम्यान, जेवढ्या जास्ती-जास्त नोंदी मिळणार आहेत, तेवढ्या प्रमाणात कुणबी दाखले देण्यास मदत होणार आहे. ही मोहीम सरकारची पुढील सूचना येईपर्यंत सुरू राहणार आहे. तोपर्यंत तालुका पातळीवर विविध विभागांतर्गत कुणबी नोंदीचा शोध घेतला जात आहे. कुणबी नोंदी तपासण्यसाठी युद्धपातळीवर काम करण्याचे आदेश तसेच तपासलेल्या अभिलेख्यांचा अहवाल दररोज सादर करा, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी संबंधित विभागांचे अधिकारी, प्रांताधिकारी व तहसीलदार यांना दिले.

 

कुणबी नोंदी तपासण्यासाठी मिशन मोडवर मोहीम राबवा. त्यासाठी सर्व विभागांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करुन कार्यवाही गतिमान करा. त्याचबरोबर सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांनी समन्वयाने हे काम युद्धपातळीवर पूर्ण करावे. कुणबी नोंदीच्या अभिलेखांचे तसेच मोडी, उर्दू लिपीतील अभिलेखांचेही भाषांतर करुन डिजिटायजेशन करुन संवर्धन करा. यासाठी पुराभिलेखागार कार्यालय व शिवाजी विद्यापीठाचा भाषा विभागाच्या माध्यमातून अधिकृत मोडी लिपी भाषिक, वाचक यांची मदत घ्या, अशी सूचना जिल्हाधिकारी रेखावार यांनी दिली आहे

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

पुणे-सोलापूर महामार्ग की खड्ड्यांचा महामार्ग?मगरपट्टा चौक ते कवडीपाट टोलनाका : रुग्णवाहिका कोंडीत, अधिकाऱ्यांना मात्र जाग येईना

Friday, 11 September 2026, 13:53

मनोज जरांगेंच्या अडचणी वाढल्या! 1000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप; EDकडे थेट तक्रार दाखल

Friday, 11 September 2026, 12:55

DJविरोधाची किंमत मोजावी लागणार? विद्यानंद बापटांविरोधात हिंदू सेवा संघ मैदानात,थेट घेतला मोठा निर्णय!

Friday, 11 September 2026, 12:34

सामाजिक चळवळीतील लढवय्या कार्यकर्ती स्मिता नॉर्टन यांचे निधन

Friday, 11 September 2026, 12:04

इंदापूर-बारामती मार्गावर आता ‘ई-शिवाई’चा प्रवास; प्रवाशानां मोठा दिलासा

Friday, 11 September 2026, 11:33

पुणेकरांच्या आरोग्याशी खेळ? पनीर -खवा तपासण्यासाठी FDA चे पथक बुधवार पेठेत दाखल, प्रशासन अलर्ट

Friday, 11 September 2026, 11:11
Next Post
Medical staff of pcmc on strike

Pune News: आम्हाला आरोग्य सेवेत सामावून घ्या; ३५ हजार वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन; रुग्णांना फटका

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp