करमाळा : मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही म्हणून निराश झालेले माजी नगरसेवक आणि मराठा महासंघाचे अध्यक्ष बलभीम राखुंडे यांनी आत्महत्या केली आहे. मराठा आरक्षणासाठी करमाळ्यातील माजी नगरसेवक आणि अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष बलभीम राखुंडे यांनी मराठा आरक्षण मिळावे. तसेच मनोज जरांगे पाटील यांना आपला पाठिंबा असल्याचे पत्र लिहीत राहत्या घरी आत्महत्या केली. बलभीम राखुंडे यांनी आत्महत्या केल्याने समाजातील सर्व स्तरातून शोक व्यक्त केला जात आहे.
माजी नगरसेवक असलेल्या बलभीम राखुंडे यांच्याकडे “मराठा समाजाला आरक्षण मिळावे, आमचा मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा आहे,”, अशा आशयाचे पत्र सापडले आहे. त्यांनी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये मराठा आरक्षण मिळत नसल्याने आपण आत्महत्या करत आहोत, असं नमूद केले आहे. बलभीम राखुंडे यांच्या आत्महत्येनंतर संपूर्ण करमाळा शहरात एकच शोककळा पसरली आहे.