सांगली : राज्यात सद्या मराठा-ओबीसी आरक्षण हा मुद्दा गाजत आहे. आता शांतच संभाजी भिडे यांनी आरक्षणावर भाष्य केले आहे. बांगलादेशमध्ये हिंदू वर होणाऱ्या अत्याचाराविरोधात श्री शिवप्रतिष्ठान सांगली जिल्ह्यात 25 ऑगस्ट रोजी कडकडीत बंद पाळला जाणार असल्याची माहिती मिळत आहे. बांगलादेशमधील नंगानाच तात्काळ थांबायला हवा यासाठी केंद्राने पुढाकार घ्यावा अशी प्रतिक्रियाही शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजी भिडे यांनी दिली आहे. तसंच मराठ्यांनी आरक्षण मागावे का? असा सवाल संभाजी भिडे यांनी उपस्थित केला आहे. सांगलीत माध्यमांशी संवाद साधत होते त्यावेळी बोलत होते.
मराठा आरक्षण हा कळीचा मुद्दा आहे, पण मराठ्यांनी आरक्षण मागावे का? मराठ्यांनी उभा देश चालवायचा आहे, आरक्षण कुठले काढले. मराठा जात संपूर्ण देशाचा संसार चालवणारी जात आहे. हे ज्यावेळी मराठ्यांच्या लक्षात येईल त्या दिवशी या मातृभूमीचं भाग्य उजळून जाईल. मात्र हे मराठ्यांच्या अजूनही लक्षात येत नाही हे दुर्दैव आहे, असे संभाजी भिडे म्हणाले.
देशात बलात्कार प्रकार हा किळसवाणा झाला..
रामगिरी महाराज यांच्या वादग्रस्त वक्तव्याबबाबत संभाजी भिडे बोलताना म्हणाले कि, मुख्यमंत्री यांची जी भूमिका आहे तीच आमची आमची भूमिका आहे. उद्धव ठाकरे आज काही गोष्टीवर बोलत नाहीत. देशात बलात्कार प्रकार हा किळसवाणा झालाय, हा अत्याचार थांबायला हवेत. कोणत्याही स्त्रीवरचा बलात्कार म्हणजे मातेवर बलात्कार आहे, असे संभाजी भिडे म्हणाले.
बांगलादेशमधील नंगानाच तात्काळ थांबायला हवा..
पाकिस्तानचा अविभाज्य भाग म्हणून बांगलादेशचा जन्म झाला. त्या बांगलादेशच्या पंतप्रधान आज हिंदूस्थानकडे आश्रयाला आल्या, दुसरीकडे कुठे गेल्या नाहीत. पंतप्रधान भारतात आल्यावर बांगलादेशमध्ये प्रतिक्रिया उमटल्या आहेत. हिंदूंवर अत्याचार होतोय, बांगलादेशमध्ये सुरू असलेला अत्याचार तात्काळ थांबला पाहिजे. हिंदूस्थानमध्ये याची संतप्त प्रतिक्रिया उमटत नाही.
बांगलादेशमध्ये हिंदूवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात श्री शिवप्रतिष्ठान सांगली जिल्ह्यात 25 ऑगस्ट रोजी कडकडीत बंद पाळला जाणार आहे. बांगलादेशमधील नंगानाच तात्काळ थांबायला हवा यासाठी केंद्राने पुढाकार घ्यावा. बांगलादेशमधील हिंदू लोकांचे अजिबात स्थलांतरन नको ,त्याना बांगलादेशमधेच सुरक्षा मिळायली हवी. सगळ्या हिंदू राजकारणी लोकांनी या गोष्टी घडल्यावर पेटून उठायला हवे, पण असं होताना दिसत नाही. असे संभाजी भिडे म्हणाले.