सोलापूर : गाडीला कट मारल्याच्या कारणावरून एका तरुणास लाथा-बुक्क्यांनी मारहाण करत लोखंडी रॉड मारून जखमी केल्याची घटना लष्कर परिसरातील बेडरपूल येथील १४ नंबर शाळा येथे घडली. या प्रकरणी रोहित भारत कय्यावाले (वय २१, रा. बेडर पूल, लष्कर) याने सदर बझार पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून रामराज उमेश फटफटवाले, राज भवनसिंग सत्तारवाले, विकी भवनसिंग सत्तारवाले (सर्वजण रा. बेडर पूल) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

यामधील फिर्यादीचा भाऊ विनायक याला रामराज व राज यांनी मिळून गाडीला कट मारल्याच्या कारणावरून भांडत असताना फिर्यादी भांडण सोडवण्यासाठी गेले असता वरील संशयित आरोपी यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. राज याने बांधकामाच्या ठिकाणी पडलेला लोखंडी रॉड हातात घेऊन फिर्यादीच्या हातावर, दंडावर व करंगळीवर मारून जखमी केले, असे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस हवालदार गायकवाड हे करीत आहेत.








