Wednesday, April 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Maharashtra Politics: काँग्रेसला निवडणुकीपूर्वी मोठा धक्का! जत पालिकेतील माजी नगराध्यक्षा शुभांगी बन्नेनवर यांच्यासह पतीचा भाजपमध्ये प्रवेश

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 9 November 2025, 22:22
Maharashtra Politics: Big shock to Congress before elections! Former Jat Municipal Corporation Mayor Shubhangi Bannenwar and her husband join BJP

Photo-Social Media

सांगली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे (Maharashtra Politics) पडघम वाजताच राजकीय (Sangali News) हालचालींना वेग आला आहे. अशातच सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक बन्नेनवर यांनी पत्नी आणि माजी नगराध्यक्षा शुभांगी बन्नेनवर यांच्यासह शनिवारी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. या घडामोडीमुळे जत शहरातील आगामी पालिका निवडणुकीचे राजकीय गणित पूर्णपणे बदलणार आहे.

 

अशोक बन्नेनवर हे जत तालुक्यातील परिचित सामाजिक कार्यकर्ते असून बहुजन समाजाचा मजबूत चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. गेल्या 25 वर्षांपासून ते स्थानिक राजकारणात सक्रिय आहेत. त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात शिवसेनेतून केली होती. त्यानंतर यशवंत सेना आणि रासपच्या माध्यमातून राजकारणात काम करत 2010 साली काँग्रेसमध्ये प्रवेश केला. ते माजी आमदार विक्रम सावंत यांचे निकटवर्तीय आणि विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जात होते.

पत्नी शुभांगी बन्नेनवर यांनी देखील राजकारणात सक्रिय भूमिका निभावली आहे. त्यांनी ग्रामपंचायत सदस्य म्हणून कारकीर्द सुरू केली आणि नंतर नगरसेविका म्हणून निवडून आल्या. 2017 साली त्या जत शहराच्या पहिल्या महिला नगराध्यक्षा बनल्या. त्यांच्या कार्यकाळात शहरातील विकासकामांमध्ये मोठ्या प्रमाणात गती आली. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक सामाजिक उपक्रम राबवले गेले आणि त्यांचा स्वतःचा एक प्रभावी कार्यकर्त्यांचा गट निर्माण झाला.

आता दोघांनी भाजपात प्रवेश केल्याने जत शहरात भाजपची संघटनात्मक ताकद मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. भाजपचे नेते डॉ. रवींद्र आरळी, शिवाजी उर्फ पप्पू डोंगरे, चंद्रशेखर गोब्बी, अण्णा भिसे, ज्योती घाडगे, परशुराम मोरे आणि इतर अनेक पदाधिकारी या प्रवेश सोहळ्याला उपस्थित होते.

या वेळी आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले की, जत आणि परिसरातील राजकारण अनेक वर्षांपासून काही प्रस्थापित नेत्यांच्या वर्चस्वाखाली राहिले आहे. यामुळे सामान्य लोक विकासापासून दूर राहिले. मात्र 2014 नंतर राज्यात सत्ता बदलल्यानंतर हे समीकरण हळूहळू बदलत आहे. अशोक आणि शुभांगी बन्नेनवर यांच्या प्रवेशामुळे जत तालुक्यात भाजपला मोठे बळ मिळणार आहे, असे त्यांनी सांगितले.

अशोक बन्नेनवर म्हणाले की, गेल्या 25 वर्षांपासून आम्ही सातत्याने लोकसेवा करत आहोत. आमच्या कुटुंबाने ग्रामपंचायतपासून नगराध्यक्षपदापर्यंत सेवा दिली आहे. शहरातील प्रत्येक प्रभागात कोट्यवधी रुपयांची विकासकामे केली आहेत. सत्ता नसल्यास विकास होऊ शकत नाही, त्यामुळे जनतेच्या विश्वासाने पुन्हा शहराच्या विकासासाठी आम्ही भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

उरुळी कांचनमध्ये घरफोडीचा डाव उधळला, शस्त्रे आणि विना नंबर प्लेटच्या गाडीसह एकाला अटक, एकजण फरार

Wednesday, 1 April 2026, 11:07

सरपंच महिलेच्या पतीची दादागिरी! पळसदेवमध्ये जुन्या वादातून शेतकरी कुटुंबावर जीवघेणा हल्ला

Wednesday, 1 April 2026, 11:03

Phursungi News: शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली सायबर चोरट्यांनी महिलेला घातला अडीज लाखांचा गंडा

Wednesday, 1 April 2026, 11:01
Daund Crime: Man beaten with a wooden stick, saying why did you promote others and not us?

पळसदेवमध्ये थेट घरात घुसून कुटुंबावर जीवघेणा हल्ला; सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Wednesday, 1 April 2026, 10:50

उरुळी कांचन येथे गांजा विक्री करणाऱ्या तरुणाला बेड्या; पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांची धडक कारवाई..

Wednesday, 1 April 2026, 10:40

पुण्यातील थरार घटना! बाचाबाची झाली अन थेट 3 पाळीव कुत्रेच अंगावर सोडले; तरुण रक्ताच्या थारोळ्यात

Wednesday, 1 April 2026, 10:33
Next Post

8th Pay Commission: आठवा वेतन आयोग 1 जानेवारी 2026 पासून लागू होणार? सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार किती वाढणार? जाणून घ्या सर्व

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.