कराड : राज्यात असलेल्या सहकारी संस्थांमध्ये सहा महिन्यानंतर अध्यक्षाच्या विरोधात संचालकांना अविश्वास ठराव आणता येत होता. मात्र, राज्य सरकारला पाठिंबा देणारे आमदार बच्चू कडू यांना अमरावती जिल्हा सहकारी बँकेत अभय देण्यासाठी सरकारने हा कायदा बदलण्यात आला आहे. किमान दोन वर्ष अविश्वास ठराव आणता येणार नाही, असा सरकारने कायदा मंजूर केला. हे सरकार सत्तेचा असा पाशवी वापर करत आहे, असा आरोप कराड पाडळी येथे एका कार्यक्रमात माजी सहकार मंत्री आमदार बाळासाहेब पाटील यांनी केला.