श्रीगोंदा : चौरंगी लढतीत अपेक्षे प्रमाणे भाजप उमेदवार विक्रम पाचपुते 37 हजार मतांच्या फरकाने विजयी झाले. त्यांनी अपक्ष उमेदवार माजी आमदार राहुल जगताप यांना 62,178 मतदान मिळवून दुसऱ्या स्थानी राहिले तर महाविकास आघाडी उमेदवार अनुराधा नागवडे यांना 53176 तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. वंचित बहुजन आघाडी उमेदवार अण्णासाहेब शेलार हे 27, 850 मते पडून चौथ्या क्रमांकावर राहिले. मात्र, 10 वर्षापूर्वी राहुल जगताप यांनी बबनराव पाचपुते यांचा 13 हजार मतांच्या फरकाने पराभव केला होता. त्याचा बदला पुत्र विक्रम पाचपुते यांनी जगताप यांचा पराभव करून घेतला.
एकूण 25 फेऱ्यांमध्ये मतमोजणी श्रीगोंदे येथील शासकीय धान्य गोदाममध्ये पार पडली. नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील गट पासून मतमोजणीस प्रारंभ झाला. सुरुवातीपासून विक्रम पाचपुते यांनी घेतलेली आघाडी शेवट पर्यंत कायम होती. 20 फेऱ्या झाल्यावर विक्रम पाचपुते यांचे मतमोजणी ठिकाणी आगमन झाले. बंडखोरी झाल्यामुळे तिरंगी लढतीत पाचपुते विजयी होताच हा मेसेज फिरला आणि महाविकास आघाडी उमेदवार अनुराधा नागवडे यांनी परिश्रम घेऊन देखील त्यांचा मत विभाजनामुळे त्यांचा पराभव झाला. अपक्ष उमेदवार राहुल जगताप यांनी 62,179 मते मिळवून दुसऱ्या क्रमांकावर राहिले तर अनुराधा नागवडे यांना 53,176 मते मिळाली.
मतदान झाल्यावर 2 दिवस राहुल जगताप निवडून येतील, असा राजकीय जाणकारांचा अंदाज होता. महायुती नेत्यांनी जगताप यांच्याशी संपर्क देखील साधला होता. तसेच खासदार शरद पवार यांच्या वतीने प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील संपर्क केल्याची वार्ता मतदार संघात फिरत होती. सोशल मीडियावर देखील जगताप यांच्या विजयाची सर्व मिडियात चर्चा होती. परंतु मतमोजणीमध्ये पहिल्या फेरी पासून विक्रम पाचपुते यांनी आघाडी घेतली ती शेवट पर्यंत कायम राहिली.
गेल्या अडीच वर्षांपासून विक्रम पाचपुते यांनी आमदार बबनराव पाचपुते यांच्या बरोबर विकास कामांसाठी केलेली धावपळ, लाडकी बहिण योजना, कार्यकर्त्यांचे जाळे, सांगता सभेत आमदार बबनराव पाचपुते यांचे भावनिक आवाहन तसेच विरोधकांमधील फूट, खासदार निलेश लंके यांनी महाविकास आघाडी उमेदवार अनुराधा नागवडे यांच्या प्रचाराकडे फिरवलेली पाठ, महाविकास आघाडी तील पक्षात पडलेली फूट हे सर्व विक्रम पाचपुते यांच्या पथ्यावर पडले आणि कोणतीच निवडणूक न लढवलेले विक्रम पाचपुते थेट विधानसभेत पोहोचले तर आजपर्यंत कोणतीच निवडणूक न हरलेले राहुल जगताप आणि अनुराधा नागवडे हे पहिल्यांदाच हरले.
भाजपने दिलेली उमेदवारी बदलून विक्रम पाचपुते यांनी स्वतः उमेदवारी घेऊन ते विक्रमी मतांनी विजयी झाले. हा देखील एक विक्रम त्यांच्या नावावर झाल्याचे म्हटल्यास वावगे ठरू नये.
विजयाचे खरे शिल्पकार हे मा.मंत्री आ. बबनराव पाचपुते
श्रीगोंद्यात विजयाच्या जल्लोषाचे प्रतिक्रिया देताना विक्रम पाचपुते म्हणाले की, ही निवडणूक जनतेने हातात घेतली होती.