Wednesday, June 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

कोयना धरणग्रस्तांनी तत्काळ जमीन मागणी अर्ज करावा; पालकमंत्री शंभूराज देसाई  

Santosh Mundeby Santosh Munde
Sunday, 24 August 2025, 11:04

सातारा : कोयना धरणग्रस्तांनी अद्यापपर्यंत जमीन मागणीसाठी अर्ज केलेला नसल्यास त्यांनी तात्काळ जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज सादर करावेत, असे निर्देश राज्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले आहेत. तसेच, जमिनींची पसंती दर्शविण्यासाठी महसूल प्रशासनाने विशेष शिबिरांचे आयोजन करावे, असेही त्यांनी सांगितले.

कोयना धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाबाबत तसेच महिंद प्रकल्पातील भूखंड वाटप प्रक्रियेचा आढावा पालकमंत्री देसाई यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत घेण्यात आला. जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी यशनी नागराजन, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, पाटणचे प्रांताधिकारी सोपान टोणपे, तहसीलदार अनंत गुरव व अन्य अधिकारी तसेच धरणग्रस्त प्रतिनिधी उपस्थित होते.

पालकमंत्री देसाई यांनी स्पष्ट केले की, ज्या धरणग्रस्तांच्या मूळ मालकांचा मृत्यू झाला आहे, त्यांच्या वारसांनी अर्ज करावा. तसेच, अद्याप जमिनींचे वाटप न झालेल्यांनी तात्काळ पसंतीनुसार जमीन निवड करावी. कागदपत्रे नसलेल्या लाभार्थ्यांना प्रशासनाकडे उपलब्ध असलेली कागदपत्रे पुरवण्यात येतील.

 

कोयना प्रकल्पग्रस्तांना दाखले मिळण्यात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी नियमांमध्ये बदल करण्यात आल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. त्यामुळे आता दाखले सहज मिळू शकतात, याचा लाभ घ्यावा, असेही ते म्हणाले.

महिंद प्रकल्पातील पुनर्वसनाचाही आढावा

महिंद प्रकल्पांतर्गत बोर्गेवाडी पुनर्वसनाचे काम पाटण तालुक्यातील चांगुलेवाडी व सांगवड येथे करण्यात आले आहे. शासनाच्या नियमानुसार प्रकल्पग्रस्तांना दोन एकर जमीन व 370 चौरस फूट भूखंड उपलब्ध करून देण्याचे आदेश देसाई यांनी दिले.

प्रकल्पातील पुनर्वसित गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची विहीर व रस्त्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्या जागेची मोजणी करून हद्द निश्चित करावी, अशाही सूचना त्यांनी केल्या. गणेशोत्सवानंतर जमिनी न मिळालेल्या लाभार्थ्यांना जमीन दाखविण्याची प्रक्रिया राबवावी आणि उदरनिर्वाह भत्याचा प्रस्ताव सादर करावा, असे निर्देशही त्यांनी बैठकीत दिले.

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

रिव्हरव्ह्यू सिटीच्या ३३ केव्ही वीजवाहिनीला थेऊर परिसरातील शेतकऱ्यांचा तीव्र विरोध; “अगोदर शेतकऱ्यांना वीज, नंतर प्रकल्पांना”

Wednesday, 24 June 2026, 10:18

मोक्कासह 15 गंभीर गुन्हे दाखल असलेला सराईत गुन्हेगार अखेर जेरबंद; पुणे ग्रामीण ATS ची कारवाई

Wednesday, 24 June 2026, 9:41

महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; राज्यात पुढील काही तास अत्यंत महत्त्वाचे, जाणून घ्या आजची स्थिती

Wednesday, 24 June 2026, 9:18

Daily Horoscope: आजचा बुधवार तुमच्यासाठी खास का आहे? वाचा संपूर्ण राशीभविष्य

Wednesday, 24 June 2026, 9:12

तुमची गाडी किती जुनी आहे? केंद्र सरकार आणतंय ‘PUCC 3.0’; जाणून घ्या आता गाडीच्या नियमात काय बदलणार

Tuesday, 23 June 2026, 22:53

पुण्यात लुटेरी दुल्हनचा कारनामा! तरुणाला जाळ्यात ओढलं, बनावट विवाह रचला अन् घरी परतताना फरार…

Tuesday, 23 June 2026, 22:31
Next Post

कौटुंबिक वादातून बायकोचा जीव घेतला, नंतर स्वत:लाही संपवलं; दोन मुलं झाली पोरकी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.