कोल्हापूर: सध्या देशात आयपीएल अर्थातच इंडियन प्रीमियर लीगचा १७ हंगाम सुरु झाला आहे. आयपीएल सुरु झाले सर्वात जास्त चर्चेत असते म्हणजे ड्रीम इलेव्हन. ड्रीम इलेव्हनच्या माध्यमातून अनेकजण लाखो रुपयांची बक्षीसे जिंकतात. आता आयपीएल २०२४ च्या चेन्नई आणि आरसीबी यांच्यामधील पहिल्याच सामन्यात नशीबानं त्याला साथ दिली व त्यानं निवडलेला संघ प्रथम क्रमांकावर आला. त्यामुळे एक कोटींचे बक्षीस मिळाले आहे. शुभम धनाजी कुंभार असं एक कोटीचा जॅकपॉट लागलेल्या तरुणाचे नाव असून तो व्यवसायाने केळी विक्रेता आहे.
ड्रीम इलेव्हनवरून एक कोटी रुपये जिंकलेला शुभम कुंभार हा मागील चार ते पाच वर्षांपासून ड्रीम ११ वर खेळत आहे. त्याचे आईवडील गेल्या चाळीस वर्षांपासून कोल्हापुरात फळविक्रीचा व्यवसाय करत आहेत. स्वप्नातही शुभमला इतक्या एवढ्या मोठं बक्षीस मिळेल, असे वाटले नव्हते. ड्रीम इलेव्हनवर अनेकजण टीम लावतात, परंतु प्रत्येकाला नशीबाची साथ मिळत नाही.
कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर कुंभार कुटूंबाचा फळांचा स्टॉल आहे. शुभमही त्याच्या आई-वडिलांसोबत फळे विकण्याचे काम करत आहे. आता मात्र आयपीएल सुरु झाल्यानंतर पहिल्याच सामन्यात त्याचे नशीब पालटले असून तो करोडपती बनला आहे. भारतात झालेल्या वर्ल्ड कपच्या वेळीही तो ड्रीम 11 ॲपवर खेळात होता. त्याला यापूर्वीही अनेक बक्षीसे मिळाली आहेत. मात्र आयपीएलच्या २०२४ हंगामातील पहिल्याच सामन्यात शुभमने एक कोटी रुपये मिळवले आहे.