सातारा : प्रेयसीचे दुसऱ्या पुरुषाशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून प्रियकराने प्रेयसीला इमारतीवरून ढकलून दिल्याने तरुणीचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे. ही घटना सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यात घडली आहे. या घटनेने शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
प्रेयसीचे नाव आरुषी सिंग असून ध्रूव छिक्कर असे आरोपी प्रियकराचे नाव आहे.
या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, कराड येथील कृष्णा मेडिकल कॉलेजमध्ये आरुषी सिंग आणि ध्रूव छिक्कर पहिल्या वर्षात शिक्षण घेत होते. प्रेयसी आरुषी आणि ध्रुव यांचे दिल्लीत एकत्र शिकत असताना तेव्हापासून त्यांचे प्रेम संबंध होते. त्यामुळे त्यांनी एकत्रच कराड मधील कृष्णा मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. ध्रूव हा कॉलेजच्या जवळच असलेल्या सन सिटी इमारतीमध्ये राहायचा. ध्रुवणे आरुषीला आपल्या फ्लॅटवर बोलावून घेतलं होतं. तुझे दुसऱ्या मुलासोबत प्रेम संबंध आहेत असे म्हणत त्याने आरुषी ला दुसऱ्या मजल्यावरून ढकलून दिले. यात आरुषीचा जागीच मृत्यू झाला.
यावेळी दोघांमध्ये झालेल्या झटापटीत ध्रुवही जखमी झाला असून त्याचा पाय मोडल्याची माहिती समोर येत आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्यामुळे त्याला अद्याप अटक करण्यात आलेली नसल्याचे सांगण्यात आले आहे. बुधवारी रात्री प्रेयसीची आई कराडमध्ये दाखल झाल्यानंतर मध्यरात्री 103 कलमाअंतर्गत ध्रुव वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.