लहू चव्हाण
पाचगणी(ता.महाबळेश्वर) : पर्यटन स्थळाबरोबरच पाचगणी हे आंतरराष्ट्रीय शैक्षणिक केंद्र आहे. पाचगणीची पर्यटकांना नेहमी भुरळ पडतात. शेतकरी, स्थावर मालमत्ताधारक, विद्यार्थी, व्यावसायिक यांच्यासाठी जम्बो झेरॉक्स आणि स्टेशनरी सुविधा गरजेची आहे, असे प्रतिपादन ‘आय लव्ह पाचगणी’ फेस्टिवलचे अध्यक्ष शिवाजी शिंदे यांनी केले. पाचगणी येथील श्री घाटजाई नागरी पतसंस्थेच्या समोर असणाऱ्या दत्त प्लाझा काॅप्लेक्स मधील बांधकाम व्यावसायिक प्रशांत मोरे यांच्या जम्बो झेरॉक्स सेंटरचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी रोटरीयन राजेंद्र पारठे, सुनील बगाडे, विशाल रांजणे, अमित भिलारे, राजेश पारठे, सुनील धनावडे, किरण पवार आदी मान्यवर उपस्थित होते. शिंदे सर पुढे म्हणाले प्रशांत मोरे यांनी सुरू केलेल्या नव्या सुविधा, व्यवसायामुळे तालुक्यातील गाव नकाशे, प्रॉपर्टी कार्डस्, सात-बारा उतारे आदी सुविधा तालुकावासियांना पाचगणीत उपलब्ध होणार आहेत.