सांगली : राज्यात सद्या लैंगिक अत्याचाराच्या घटना वाढत असून राज्यामध्ये महिला सुरक्षेचं काय? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. अशातच यावर शरद पवार यांनी भाष्य केलं आहे. सरकारनं लाडकी लेक योजना आणली आहे, त्याचे स्वागत आहे. पण तेवढ्यावर भागत नाही. मुलींवर होणाऱ्या अत्याचाराबाबत सरकारनं पाऊल उचलले पाहीजे असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे.
महिला अत्याचारात वाढ हे चिंताजनक असल्याचे पवार म्हणाले. लाडकी लेकसाठी हजारो कोटींची तरतूद करत असताना सरकारच्या अन्य योजना थंडावल्या आहेत असं देखील शरद पवार म्हणाले आहेत. ते सांगलीत आयोजीत केलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
मराठी शाळांची संख्या कमी..
मराठी शाळांची संख्या कमी होत आहे. त्याचबरोबर मराठी शाळांमधील मुलांची संख्या देखील कमी होत आहे. वारंवार या दोन तक्रारी येत आहे. ही अतिशय चिंताजनक बाब असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले. यामुळं शिक्षकांच्या नोकऱ्या देखील कमी होत असून यासाठी सर्वांनी बसावं लागेल, राज्य सरकारला लक्ष द्यावं लागणार आहे. असे शरद पवार म्हणाले आहेत.