सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात मतदार नोंदणी करण्याची अंतिम संधी आता उद्यापर्यंतच आहे. ज्या शिक्षक किंवा पदवीधरांची मतदार म्हणून नोंदणी अद्याप झालेली नाही, त्यांना शनिवार, २६ सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम तारखेच्या १० दिवस अगोदरपर्यंत नवीन मतदार नोंदणी करता येते.

मतदार नोंदणीसाठी शुक्रवार, २५ सप्टेंबर आणि शनिवार, २६ सप्टेंबर या दोन्ही दिवशी तहसील कार्यालयातील निवडणूक शाखा सुरू ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे इच्छुक शिक्षक आणि पदवीधरांना उद्यापर्यंत नोंदणी करता येणार आहे. त्यानंतर मतदारांची अंतिम आकडेवारी स्पष्ट होईल.

पाच जिल्ह्यांचा समावेश असलेल्या या मतदारसंघात सध्या ३ लाख ७ हजार ८२३ पदवीधर आणि ५१ हजार ७५० शिक्षक मतदार आहेत. सोलापूर जिल्ह्यात ३७ हजार ९५७ पदवीधर आणि १३ हजार १३६ शिक्षक मतदार आहेत. सध्याच्या मतदारसंख्येनुसार जिल्ह्यात पदवीधर मतदारसंघासाठी १०९, तर शिक्षक मतदारसंघासाठी ७१ मतदान केंद्रे आहेत. उद्यापर्यंत होणाऱ्या नव्या नोंदणीमुळे मतदान केंद्रांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.

सोलापूर जिल्ह्यात करमाळा मतदारसंघात ३,८३८ पदवीधर आणि १,२७५ शिक्षक, माढ्यात ४,३६४ पदवीधर आणि १,३३० शिक्षक, बार्शीत ३,०२२ पदवीधर आणि १,४३१ शिक्षक, तर मोहोळमध्ये ४,२५३ पदवीधर आणि ९५३ शिक्षक मतदार आहेत.
सोलापूर शहर उत्तरमध्ये १,३७० पदवीधर आणि ५७१ शिक्षक, शहर मध्यमध्ये १,०५९ पदवीधर आणि ४३१ शिक्षक, अक्कलकोटमध्ये १,९८१ पदवीधर आणि ९९० शिक्षक, तर सोलापूर दक्षिणमध्ये ४,३७७ पदवीधर आणि १,४१६ शिक्षक मतदार आहेत. पंढरपूरमध्ये ४,७१४ पदवीधर आणि १,८१० शिक्षक, सांगोल्यात ४,२३९ पदवीधर आणि १,७६३ शिक्षक, तर माळशिरसमध्ये ४,७४० पदवीधर आणि १,१६६ शिक्षक मतदार आहेत.
पदवीधर मतदारांसाठी पदवी प्रमाणपत्र किंवा पदवीची मार्कशीट/प्रमाणपत्राची सत्यापित प्रत आवश्यक आहे. शिक्षक मतदारांसाठी संबंधित शैक्षणिक संस्थेच्या मुख्याध्यापक किंवा प्राचार्यांचे प्रमाणपत्र तसेच गेल्या सहा वर्षांत किमान तीन वर्षे अध्यापन केल्याचा पुरावा आवश्यक आहे.
पत्राची सत्यापित प्रत आवश्यक आहे. शासकीय सेवेत असलेल्या काही प्रकरणांत कार्यालयीन नोंदीतील शैक्षणिक पात्रतेचा प्रमाणित दाखलाही देता येतो. पदवीची पात्रता निर्धारित पात्रता तारखेच्या किमान तीन वर्षे आधीची असणे आवश्यक आहे. पदवी उत्तीर्ण झाल्याची तारीख म्हणून विद्यापीठाने निकाल जाहीर केलेली तारीख ग्राह्य धरली जाते.
शिक्षक मतदारांसाठी संबंधित शैक्षणिक संस्थेच्या मुख्याध्यापक किंवा प्राचार्यांचे प्रमाणपत्र, गेल्या सहा वर्षांत किमान तीन वर्षे अध्यापन केल्याचा पुरावा तसेच संस्थेचे नाव, अध्यापनाचा कालावधी आणि पदाची माहिती आवश्यक आहे. गरजेनुसार संस्थेच्या सेवा नोंदीतील प्रमाणित पुरावाही द्यावा लागेल.






