Friday, October 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

फुरसुंगीत पहाटे एटीएम फोडण्याचा प्रयत्न; छिन्नी-हातोड्याने मशीनची तोडफोड

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 25 September 2026, 16:17

फुरसुंगी, ता. 25 : पहाटेच्या सुमारास चोरट्याने एटीएम मशीन फोडून रोकड लुटण्याचा प्रयत्न केल्याची घटना फुरसुंगी गावात घडली. चोरट्याने छिन्नी आणि हातोड्याच्या सहाय्याने एटीएम मशीनची तोडफोड केली. मात्र, रोकड लुटण्यात त्याला यश आले नाही. या घटनेत एटीएम मशीनचे सुमारे 55 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. ही घटना शुक्रवारी (ता. 25) पहाटे सुमारे 3.10 वाजता घडली. याप्रकरणी एटीएम देखभाल करणाऱ्या कंपनीच्या एरिया मॅनेजरने फुरसुंगी पोलिसांकडे तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हर्षद सुरेंद्र सुतार (वय 38, रा. उरुळी देवाची) हे एटीएम देखभाल व दुरुस्तीचे काम करणाऱ्या कंपनीत एरिया मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या नियंत्रणाखाली हडपसर, खराडी, वाघोली, वडगावशेरी परिसरातील एचडीएफसी बँकेच्या एटीएमची देखभाल केली जाते. शुक्रवारी पहाटे 3.48 वाजता कंपनीच्या कमांड सेंटरमधून सुतार यांना फोन आला. फुरसुंगी गावातील एचडीएफसी बँकेच्या एटीएममध्ये एका अनोळखी व्यक्तीने तोडफोड करून चोरी करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती त्यांना देण्यात आली.

यानंतर सुतार यांनी सकाळी सुमारे 9 वाजता घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यावेळी एटीएम मशीनचा कॉस्मेटिक दरवाजा, प्रेझेंटर, शटर असेंब्ली, एस अँड जी लॉक आदींची तोडफोड झाल्याचे निदर्शनास आले. तोडफोडीत एटीएमच्या विविध भागांचे नुकसान झाले असून त्याची अंदाजे किंमत पुढीलप्रमाणे आहे. प्रेझेंटर – 35 हजार रुपये,शटर असेंब्ली – 15 हजार रुपये, कॉस्मेटिक दरवाजा – 5 हजार रुपये
अशा प्रकारे एकूण 55 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

मास्कधारी चोरटा सीसीटीव्हीत कैद
दरम्यान, कंपनीच्या कमांड सेंटरकडून मिळविण्यात आलेल्या व्हिडीओ फुटेजमध्ये एक व्यक्ती छिन्नी आणि हातोड्याच्या साहाय्याने एटीएम फोडण्याचा प्रयत्न करताना दिसून आली आहे. सीसीटीव्हीतील वर्णनानुसार, संबंधित व्यक्तीने काळ्या रंगाचा मास्क, पांढरा शर्ट आणि काळी पॅन्ट परिधान केली होती. त्याच्या एका हातात केसरी रंगाचे हॅन्डग्लोज होते. त्याचे वय अंदाजे 25 ते 30 वर्षे असून उंची सुमारे पाच फूट सहा इंच आणि बांधा मध्यम असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. एटीएम फोडून रोकड लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या या अज्ञात व्यक्तीविरोधात कायदेशीर तक्रार दाखल करण्यात आली असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांकडून चोरट्याचा शोध सुरू आहे.

 

 

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

फार्मर आयडीच्या आधारे स्वतंत्र शेतकरी ओळखपत्र तयार करण्यास मनाई! अनधिकृत ओळखपत्रांची निर्मिती व वितरण थांबविण्याचे कृषी विभागाचे आवाहन

Friday, 16 October 2026, 18:53

पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा; पुणेकरांच्या तहानेचा प्रश्न ऐरणीवर! धरणातील पिण्याचे पाणी वाचवण्यासाठी मुंढवा जॅकवेल पूर्ण क्षमतेने चालवण्याची मागणी

Friday, 16 October 2026, 18:31

अलिबागच्या लॉजवर तरुणाचा गूढ अंत! होणाऱ्या पत्नीसोबत फिरायला गेला, पण घडलं भयंकर; मृत्यूचं गूढ वाढलं!

Friday, 16 October 2026, 17:54

पुण्यात लोणीकंदमध्ये ३ जणांनी अचानक तरुणाला घेरलं! चेहऱ्यावर, गळ्यावर, छातीवर कोयत्याने सपासप वार; भररस्त्यात खुनाचा थरार…

Friday, 16 October 2026, 17:36

‘लहरा दो तिरंगा’ आंदोलनापूर्वी मोठी कारवाई! अभिजीत दिपकेंना पोलिसांनी घेतलं ताब्यात; आता रॅलीचं नेतृत्व कोण करणार?

Friday, 16 October 2026, 17:32

सरकारी कर्मचाऱ्यांनो दिवाळीआधीच खिशात पडणार बोनस! किती महिन्यांचा बोनस पगार मिळणार? मोठी माहिती समोर

Friday, 16 October 2026, 17:26
Next Post

शरद पवारांच्या सिल्व्हर ओकवर ‘गुप्त’ खलबतं? पार्थ पवारांच्या उपस्थितीने चर्चांना उधाण,पडद्यामागे नेमकं काय?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp