प्रमोद आहेर
श्रीगोंदा (अहमदनगर): रयत शिक्षण संस्थेचे महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी नीट परीक्षा 2023-24 मध्ये घवघवीत यश प्राप्त केले आहे.
नीट या परीक्षेत श्रेयस मारुती सोनवणे 640 गुण, शुभदा वामन खाडे 617 गुण, श्रद्धा सदाशिव कापसे 577 गुण, निकिता साहेबराव काळाने 552 गुण, श्वेता दत्तात्रेय दिवेकर 534 गुण, सार्थक राहुल देशमुख 517 गुण, रेश्मा सेवक भोगील 500 गुण, तन्मय दिलीप दरेकर 480 गुण प्राप्त केले आहेत.
महाविद्यालयामध्ये नियमितपणे नीट, जेईई व सीईटी या स्पर्धा परीक्षांचे स्वतंत्र मार्गदर्शन तसेच क्रॅश कोर्सचे वर्ग नियमितपणे चालू आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांचे महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन आ. बबनराव पाचपुते, मॅनेजिंग कौन्सिल सदस्य माजी आ. राहुल जगताप, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मा. बाबासाहेब भोस, प्रभारी प्राचार्य डॉ. महादेव जरे, उपप्राचार्य प्रा. शहाजी मखरे, पर्यवेक्षक रत्नाकर झिटे, विज्ञान विभाग प्रमुख बाळासाहेब शेटे सर्व प्राध्यापक शिक्षकेतर सेवक यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.