सोलापूर : सर्वत्र आज १४ फेब्रुवारी हा व्हॅलेंटाईन डे म्हणून साजरा केला जातो. तरुणाईमध्ये आजच्या दिवसाची वेगळीच क्रेझ पाहायला मिळत आहे. तसेच तरुणाईसह प्रेम साजरं करणाऱ्या जोडप्यांसाठी हॉटेल्स आणि पर्यटन ठिकाणे गजबजून गेले आहेत. अशातच आज नृत्यांगणा गौतमी पाटील ही देवदर्शनासाठी पंढरपुरात आली असता तिने प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी तिने व्हॅलेंटाईन डे वर भाष्य केलं, ती म्हणाली कामाच्या व्यस्ततेमुळे दौरे सुरू असून आजही जत येथील कार्यक्रमासाठी मी आले होते. त्यामुर्वी पंढरपुरात देवाचं दर्शन घ्यावं म्हणून विठुरायाचरणी नतमस्तक होण्यासाठी आली आहे. असं गौतमीने सांगितलं.
गौतमी म्हणाली, मी देवाचं दर्शन घेण्यासाठी पंढरपुरात आले आहे. त्यावेळी, येथे मंदिरात विठ्ठल-रुक्मिणी देवाचं आज लग्न असल्याचं समजलं. व्हॅलेंटाईन डे हे तर आपणच निर्माण केलेलं आहे, पण देवाचं लग्न होतंय हे छान आहे, असं गौतमी म्हणाली. तसेच, सर्वांना व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छाही यावेळी तिने दिल्या.
मला राजकारण जास्त कळत नाही: गौतमी
मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या उपोषणाबद्दल प्रश्न विचारला असता ती म्हणाली, माझा मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे. मात्र, मला राजकारण किंवा या गोष्टींबाबत जास्त काही कळत नाही. मी एक कलाकार आहे, मी कला सादर करते, तसेच मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, असही गौतमी पाटील म्हणाली.