अहमदनगर : अहमदनगर शहरात पुन्हा एकदा टोळी युद्धातून भर बाजारपेठेत एका तरुणाला दांडक्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. शहरामध्ये असणाऱ्या मुख्य बाजार पेठेत दोन गटातील वादातून ही हाणामारीची घटना घडली आहे. तरुणाला मारहाण करतानाची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. या प्रकरणी अद्याप पोलिसांकडे गुन्हा दाखल झालेला नाही. गेल्या आठवड्यात जाधव आणि मूर्तडक गटात झालेल्या हाणामारीतून ही मारहाण झाल्याची माहिती मिळत आहे.