सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते सोलापुरचे माजी महापौर महेश कोठे यांचे निधन झाल्याची धक्कादायक बातमी समोर अली आहे. या घटनेने सोलापुरात खळबळ उडाली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महेश कोठे हे प्रयागराज येथे कुंभमेळ्यासाठी गेले होते, तेव्हा ते गंगा नदीमध्ये शाही स्नान करून बाहेर पडले. त्यानंतर थंडीमुळे रक्त गोठले आणि त्याच वेळेस त्यांना हृदयविकाराचा जोरदार झटका आला. हॉस्पिटलमध्ये नेण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये शहर उत्तर मधून महेश कोठे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून निवडणूक लढवली होती, परंतु त्यांना त्यामध्ये अपयश आले होते. यापूर्वीही त्यांनी तीन वेळा विधानसभा निवडणूक लढवली होती.
सोलापूरचे महापौर पद भूषवले..
महापालिकेतील एक मोठे नेते म्हणून त्यांचे महाराष्ट्रातमध्ये नाव होते. महानगरपालिकेचा प्रचंड अनुभव असलेल्या नेत्याचे अचानक निधन झाल्याने सोलापुरात हळहळ व्यक्त केली जात आहे.