करमाळा : भीमा नदी पात्रात वादळी वाऱ्यामुळे आणि पाण्याच्या लाटांमुळे मंगळवारी झालेल्या बोट दुर्घटनेत कुगाव कडून कळाशी कडे निघालेली बोट पलटी झाल्याने सहा जण नदीपात्रात बुडाले होते. व पोलीस उपनिरीक्षक राहुल डोंगरे यांनी पोहत काळाशीची कडा गाठली व आपला जीव वाचवला.
त्या दुर्घटनेतील बुडालेली व्यक्ती पुढील प्रमाणे गोकुळ जाधव (वय -30), कोमल गोकुळ जाधव (25), माही गोकुळ जाधव (3), शुभम गोकुळ जाधव (दीड वर्ष) सर्व राहणार झरे ता. करमाळा, अनुराग अवघडे (28) बोट चालक, गौरव डोंगरे (16) हे या दुर्घटनेमध्ये बुडाले होते.
बुधवारी सकाळी एनडीआरएफ चे पथक दाखल झाले होते. गुरुवारी आज सकाळी एनडीआरएफ च्या पथकाला पाच व्यक्तींना शोधण्यात यश आले. यामध्ये दोन चिमुकल्यांचा शोध लागला आहे. मृत व्यक्तींची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.