अहमदनगर : शहरात माळीवाडा वेस ते मार्केट यार्ड डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा दिशेने जाणाऱ्या रोडवर एका युवकांनी आर्थिक घेवाण देवाणच्या कारणावरून डॉक्टरांवर गोळीबार केल्याची घटना घडली. याप्रकरणी कोतवाली पोलिसांच्या सतर्कतेने आरोपीस लगेच ताब्यात घेण्याची कारवाई झाल्याने मोठी अनर्थ घटना टाळला आहे.
बुधवारी संध्याकाळी साडेपाच ते पावणे सहाच्या सुमारास ही घटना घडली. कोतवाली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना ही घटना कळताच काही क्षणात त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने घटनास्थळी धाव घेत एका आरोपीला ताब्यात घेतले आहे.