गडहिंग्लज : गडहिंग्लज विभागात लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या अनुषंगाने विविध ठिकाणी कारवाई करून गुटखा, मद्य व आचारसंहिता भंग प्रकरणी अकरा जणांविरुद्ध परि. सहा. पो. अधीक्षक हर्षवर्धन बी. जे. यांनी गुन्हे दाखल केले आहेत.
याबाबत मिळालेली माहिती आशी, निवडणुकीच्या अनुषंगाने कर्नाटक राज्यातून येणाऱ्या वाहनांची तपासणी नाक्यावर तपासणी सुरू होती. हलकर्णी तपासणी नाक्यावर चारचाकी क्र. (एम.एच.०८-ए.जी. ४९०४) या वाहनातून ९ हजार २८८ रुपये किमतीचा वेगवेगळ्या किमतीचा गुटखा वाहतूक करताना आढळून आल्याने संबंधित वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून चारचाकी वाहन व गुटखा, असा सुमारे ७९ हजार २८८ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई नितीश घाटगे, विलास भोसले, कांबळे यांनी केली आहे. बेकायदेशीरपणे मद्य विक्री करताना सात ठिकाणी छापे टाकून सुमारे १७ हजार ९९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी राहुल डोंगरे (रा. नरेवाडी), सुशांत सोरटे (रा. गिजवणे), प्रवीण जोशिलकर (रा. करंबळी), रमेश नागराळे (रा. हेब्बाळ क ।। नूल), रणजित होडगे (रा. इंचनाळ), पुंडलिक आरबोळे (रा. जरळी), विवेकानंद सत्तेगिरी (रा. बुगडीकट्टी) यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून, मद्याच्या ३६३ बाटल्या जप्त केल्या आहेत. ही कारवाई संभाजी जाधव, नारायण देसाई, रविकांत शिदि, अरुण पाटील, अंजली पाटील, गणेश मोरे यांनी केली आहे. लोकसभा निवडणुको दरम्यान आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हे दाखल केले असून, अरुण पाटील, दिलीप पाटील, संभाजी जाधव यांनी ही कारवाई केली आहे.