सांगली : सांगलीतून एक धक्कादायक घटना घडल्याचे उघड झाले आहे. सांगलीमध्ये कॉलेज कॉर्नर भागामध्ये एका महाविद्यालयीन युवतीवर चाकू हल्ला झाल्याची घटना घडली आहे. युवतीच्या पतीनेच तिच्यावरती चाकूने हल्ला केला असल्याची माहिती मिळत आहे. यावेळी युवतीच्या हातावरती वार झाल्याने गंभीर दुखापत झाली आहे. काही दिवसांपुर्वी या दोघांचा प्रेमविवाह झाला असल्याची माहिती समोर आली आहे.
सदर घटनेत झालेल्या हल्ल्यामध्ये युवतीच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. युवती कॉलेजला जात असताना तिच्यावरती हा हल्ला करण्यात आला आहे. युवतीच्या पतीने तिच्यावर हल्ला का केला याबाबतची अद्याप माहिती मिळू शकलेली नाही.