-प्रमोद आहेर
श्रीगोंदा (अहमदनगर) : थायलंड येथे झालेल्या आशियाई चॅम्पियनशिप अंडर-20 महिलांच्या कुस्ती स्पर्धेत श्रीगोंद्याची सुवर्णकन्या धनश्री फंड हिने 55 किलो वजन गटात सुवर्णपदक पटकावले. अंतिम फेरीत जपानची युना हिच्यावर 6-4 अशी मात करून धनश्रीने सुवर्णपदकावर नाव कोरले.
आंतरराष्ट्रीय स्तरावर तिने हे दुसरे पदक मिळविले आहे. धनश्रीने सेमीफायनलमध्ये चीनची लुईझुवान चेन हिच्यावर 13-10 अशी मात करून अंतिम फेरीत प्रवेश निश्चित केला होता. अगोदरच्या फेरीत तिने कझाकस्तानची अझिझा शुमकारोमा हिच्यावर 12-2 अशी मात केली होती. धनश्रीने आपली चमत्कार कामगिरी करत आपल्या देशासाठी सुवर्णपदकाची कमाई केली याबद्दल तिच्यावर सर्वत्र कौतुक होत आहे.
धनश्रीच्या यशाच्या पाठीमागे तिचे मार्गदर्शक वडील हनुमंत फंड, कोच मनीष तसेच तिला मार्गदर्शन करणारे पैलवान राहुल पाचपुते, सागर पवार, सागर जाधव आणि हरिभाऊ काळे, आप्पा सोनवणे, सागर पवार, वाल्मीक दादा साबळे. सुदाम जगताप, संजू जगताप यांचे तिला मार्गदर्शन लाभले. तसेच आर्थिक सहाय्य करणारे बाळासाहेब रावत पुणे, आरुण आनंदकर, विजय बोरुडे यांचे तिने आभार मानले.