Monday, August 31, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

कुकडी उजनी उपसा सिंचन योजनेच्या सर्वेक्षण निधी संदर्भात दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी दिले ‘हे’ निर्देश

सागर घरतby सागर घरत
Tuesday, 2 July 2024, 16:25

करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुक्याच्या दृष्टीने कुकडी उजनी उपसा सिंचन योजना अतिशय महत्त्वाची योजना आहे. कुकडी उजनी उपसा सिंचन योजनेच्या सर्वेक्षणासाठी, महाराष्ट्र राज्य कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या सिंचन/बिगर सिंचन खात्यातून निधी उपलब्ध व्हावा. यासाठी या योजनेचे जनक आमदार संजयमामा शिंदे यांचा सन 2022 पासून पाठपुरावा सुरू असून त्यांना अखेर यश आले आहे.

सोमवार (दि.01) जुलै रोजी या संदर्भातील पत्रावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ कार्यवाही करण्यात यावी, असा शेरा दिला. तर आज मंगळवारी (दि.02) जुलै रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याविषयी जलसंपदा विभागाचे सचिव डॉ. संजय बेलसरे व महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले यांना निधी उपलब्ध करून देणे संदर्भात निर्देश दिले आहे.

यावेळी राजगोपाळ देवरा अप्पर मुख्य सचिव (नियोजन ), ओ. पी. गुप्ता अप्पर मुख्य सचिव (वित्त) तसेच जलसंपदा विभागाचे सचिव डॉ. संजय बेलसरे, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, जलसंपदा पुणे (वि.प्र ) चे मुख्य अभियंता हेमंत धुमाळ, जलसंपदा पुणे विभागाचे मुख्य अभियंता हनुमंत गुणाले यांच्यासह आमदार रामराजे नाईक निंबाळकर, आमदार बबनदादा शिंदे, आमदार दीपक चव्हाण, आमदार संजयमामा शिंदे आदी उपस्थित होते.

नियोजित कुकडी उजनी उपसा सिंचन योजनेच्या सर्वेक्षणासाठी महामंडळाच्या सिंचन / बिगर सिंचन खात्यातून निधी उपलब्ध व्हावा या संदर्भात आमदार संजयमामा शिंदे यांनी 7 फेब्रुवारी 2022 रोजी तत्कालीन जलसंपदा मंत्री ना.जयंत पाटील व महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक यांना पत्रव्यवहार केलेला होता.

 

कुकडी डाव्या कालव्यातून करमाळा तालुक्यासाठी प्रकल्प तरतुदीनुसार पुरेसे पाणी उपलब्ध होत नसल्याने उजनी प्रकल्पातून कुकडीचे पाणी उचलण्यासाठी कुकडी उजनी उपसा सिंचन योजना प्रस्तावित करण्यात आली आहे. सदर योजनेचे लाभक्षेत्र कुकडी प्रकल्पाच्या तिस-या मंजूर प्रकल्प अहवालाप्रमाणे असून त्यात कोणतीही वाढ किंवा घट नाही. केवळ कुकडी डाव्या कालव्यातून पाणी 250 कि.मी. अंतरावरून वाहून आणण्यात येत असलेल्या अडचणी व पाणी नाश टाळण्यासाठी उजनी धरणातून कुकडीचे करमाळा तालुक्याच्या वाट्याचे पाणी उचलणे प्रस्तावित आहे. सबब कुकडी प्रकल्प यंत्रणेवरील सिंचन व्यवस्थापनाचा ताण कायमचा कमी होणार असल्याने या योजनेचे सर्वेक्षण तातडीने होणे गरजेचे असल्याचे आमदार संजयमामा शिंदे यांनी निवेदनात सांगितले.

सागर घरत

सागर घरत

ताज्या बातम्या

200 वर्षांनंतर घरात चिमुकलीचा जन्म? रथातून मिरवणूक काढून लेकीचे दणक्यात स्वागत!

Monday, 31 August 2026, 20:53

अमित ठाकरेंनी काढला पंतप्रधान मोदींचा फोटो; पुण्यातील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये मोठा राडा, २५ जणांवर गुन्हा दाखल

Monday, 31 August 2026, 20:20

महाराष्ट्राच्या मतदार यादीतून तब्बल २ कोटींहून अधिक नागरिक गायब? SIR प्रक्रियेनंतर निवडणुकीच्या वर्तुळात खळबळ!

Monday, 31 August 2026, 19:39

उजनीत मच्छीमारांचा जलआक्रोश; ई-टेंडर, तरंगत्या सौरप्रकल्पाला विरोध

Monday, 31 August 2026, 19:34

तुर्भेतील अन्नपदार्थांच्या पॅकेजिंगमध्ये फेरफार करणारे रॅकेट उध्वस्त; ७५ लाखांचा साठा जप्त

Monday, 31 August 2026, 19:05

पुण्यातील भाजपच्या प्रदेश कार्यकारिणी बैठकीत FDA ची धाड! नेत्यांसाठी आलेल्या जेवणाची अचानक तपासणी झाल्याने खळबळ

Monday, 31 August 2026, 18:37
Next Post

मोठी बातमी! शिंदे गटाच्या कुंडलिक खांडेच्या पोलीस कोठडीत तीन दिवसांची वाढ; बीड न्यायालयाचे आदेश

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp