पाचगणी : महाबळेश्वर तालुक्याच्या विज्ञान प्रदर्शनात प्राथमिक गटात दानवलीच्या साक्षी दानवले या विद्यार्थिनीच्या उपकरणाने तर माध्यमिक शाळा गटामध्ये सेंट झेव्हियर्स हायस्कूल, पाचगणीच्या धृती दौडा या विद्यार्थिनीच्या उपकरणाने प्रथम क्रमांक पटकावला.
शिक्षकांच्या गटात निलेश होमकर व विष्णु ढेबे यांनी प्रथम क्रमांक पटकावला असून, या सर्व उपकरणांची जिल्हा विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली आहे. महाबळेश्वरच्या गिरीस्थान प्रशालेच्या कृष्णा प्रमोद पवार या दिव्यांग विद्यार्थिनीच्या उपकरणाची राज्यस्तरावर निवड झाली आहे.
सातारा जिल्हा परिषद व महाबळेश्वर पंचायत समितीच्या शिक्षण विभागामार्फत तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन भारती विद्यापीठ, गोडवली येथे आयोजित करण्यात आले होते. तीन दिवस सुरू असलेल्या प्रदर्शनाचा समारोप पारितोषिक वितरण कार्यक्रमाने झाला.
या वेळी महाबळेश्वर तालुक्याच्या तहसीलदार तेजस्विनी पाटील, गटशिक्षणाधिकारी आनंद पळसे, ‘आय लव्ह पाचगणी’ फेस्टिवलचे अध्यक्ष शिवाजी शिंदे, शिक्षक संघटनेचे अध्यक्ष भाऊसाहेब दानवले, शिवाजी निकम, भारती विद्यापीठ हायस्कूलचे मुख्याध्यापक शहाजी सावंत, लक्ष्मण उबाळे, रवीकांत यादव, हणमंत जाधव, साईप्रसाद टिंगरे, सुरेंद्र भिलारे, दगडू ढेबे आदी मान्यवर उपस्थित होते.
प्राथमिक शाळा गटात जि .प. शाळा दानवलीच्या साक्षी दत्तात्रय दानवले हिच्या ‘धूळ साठवण छत्री’ या उपकरणाचा प्रथम, जि. प. शाळा राजपुरीच्या वैष्णवी मराठे हिच्या ‘पूल कोसळण्यापूर्वी सूचना देणारे यंत्र’ याचा द्वितीय तर अंजुमन हायस्कूल पाचगणीच्या अजीम शेख याच्या ‘आग आणि वायू डिटेक्टर’ यंत्राने तृतीय क्रमांक पटकावला.
माध्यमिक गटात सेंट झेव्हियर्स हायस्कूल, पाचगणीच्या धृती दौडा या विद्यार्थिनीच्या ‘ध्वनी तरंग निर्मिती’ या उपकरणाचा प्रथम, न्यू इरा हायस्कूल पाचगणीच्या ‘जीवन शैली’ या उपकरणास द्वितीय तर चेतन दत्ताजी हायस्कूल मेटगुत्ताडच्या ऋषभ काळे याच्या ‘मानवचलीत रोप लावणी यंत्र’ या उपकरणास तृतीय क्रमांक मिळाला.
* विज्ञान प्रश्नमंजुषा मराठी माध्यम (माध्यमिक विभाग)
– हिल रेंज माध्यमिक विद्यालय भिलार – प्रथम क्रमांक
– चेतन दत्ताजी हायस्कूल – द्वितीय क्रमांक
– भारती विद्यापीठ हायस्कूल – तृतीय क्रमांक
* प्रश्नमंजुषा मराठी माध्यम (प्राथमिक विभाग)
– इलाबेन महेता विद्यालय तळदेव – प्रथम क्रमांक
– हिल रेंज माध्यमिक विद्यालय भिलार – द्वितीय क्रमांक
– जि. प. प्राथमिक शाळा चिखली – तृतीय क्रमांक
* प्रश्नमंजुषा इंग्रजी माध्यम (प्राथमिक विभाग)
– स्कॉलर फाउंडेशन – प्रथम क्रमांक
– एम. इ. एस. हायस्कूल महाबळेश्वर आणि शालम इंटरनॅशनल स्कूल – द्वितीय क्रमांक
– सेंट झेवियर्स हायस्कूल – तृतीय क्रमांक
* प्रश्नमंजुषा इंग्रजी माध्यम(माध्यमिक विभाग)
– अंजुमन इस्लाम पब्लिक स्कूल – प्रथम क्रमांक
– न्यू इरा हायस्कूल – द्वितीय क्रमांक
– स्कॉलर फाउंडेशन फाउंडेशन & शालम इंटरनॅशनल स्कूल – तृतीय क्रमांक मिळविला
प्राथमिक शिक्षक गटात विष्णू ढेबे यांच्या ‘अध्ययन-अध्यापनात माहिती तंत्रज्ञानाचा वापर’ या शैक्षणिक साहित्यास तर माध्यमिक शिक्षक गटात चेतन दत्ताजी हायस्कूल मेंटगुताडच्या निलेश होमकर यांच्या ‘प्रकाश पेटी’ उपकरणास प्रथम क्रमांक मिळाला.
प्राथमिक गटातील कृष्णा प्रमोद पवार या अपंग विद्यार्थिनीच्या ‘हर्बल मेडिसिन’ या उपकरणाची निवड राज्यस्तरावर झाली आहे.
लक्ष्मण उबाळे, रवीकांत यादव, हणमंत जाधव व साईप्रसाद टिंगरे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमोद पवार व संगीता अदाटे यांनी केले तर आभार सुनील भालेराव यांनी मानले. प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी श्रीनिधी जोशी, निलेश होमकर, विश्वजित माने, प्रमोद रांजणे, निलेश सपकाळ, सुनील भालेराव यांनी परिश्रम घेतले.