सांगली : कोल्हापूर शहरात कोरोना रुग्ण सापडल्यानंतर आता सांगलीमध्येही दोन कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे. सांगली शहरात वयोवृद्ध दाम्पत्याला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. या रुग्णांना कोणत्या व्हेरियंटचा कोरोना आहेत. त्यांचे नमुने पुण्याला पाठविण्यात येणार आहेत. तर 14 जणांची चाचणी निगेटिव्ह आली आहे.
जिल्हा प्रशासनाकडून काळजी घेण्याचे आवाहन
सर्दी, ताप असल्याने त्यांची कोरोना टेस्ट घेण्यात आली. त्यांची प्रकृती चांगली आहे. रुग्णाच्या पत्नीची टेस्ट पोजिटिव्ह आली असली, तरी कोणतेही लक्षणे नाहीत. सध्या याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यातही यंत्रणा सतर्क ठेवण्यात आली आहे. नागरिकांनी आठवडी बाजार, मॉल्स, लग्न समारंभात जाता मास्कचा वापर करावा, कोरोना बचावासाठीच्या नियमांचे पालन करावे, जर कोणाला लक्षणे आढळल्यास त्यांनी तपासणी करून घ्यावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जास्त जाऊ नये
नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जास्त जाऊ नये, बाहेर फिरत असताना मास्कचा वापर करावा, तसेच सॅनिटायझर्सचा जास्तीत जास्त वापर करावा, असे आवाहन केले आहे. सांगलीत दोन कोरोना रुग्ण आढळल्याने व राज्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्ण वाढत असल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.