-प्रमोद आहेर
श्रीगोंदा : श्रीगोंदा विधानसभा मतदार संघात आमदारकीसाठी कारखानदार आणि शिक्षण सम्राट यांच्यातच खरी चुरस असून शिक्षण सम्राट उमेदवारांनी प्रशासकीय, निवडणूक सह प्रचार यंत्रणेच्या कामासाठी शिक्षण संस्थेमधील शिक्षकांची सर्रास नियुक्ती केली असल्याचे चित्र दिसून येत आहे.
शिक्षक देखील पोलिस स्टेशन, तहसील कार्यालय, तसेच उमेदवारांचे निवडणूक संपर्क कार्यालयासह मतदार संघातील गावोगावी असलेली जबाबदारी ते प्रभावीपणे पार पाडत आहे . मात्र, याकडे निवडणूक निर्णय अधिकारी हे जाणून बुजून दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे.
या बाबत सविस्तर वृत्त असे की, श्रीगोंदा विधानसभा मतदार संघात विधानसभा निवडणुकीचे वारे जोरदार सुरू आहे. निवडणुकीत शिक्षणसंस्था चालक उमेदवारी करत असल्याने व त्यांच्या तालुक्यात माध्यमिक विद्यालय, उच्च माध्यमिक विद्यालय, इंग्लिश मिडियम, लॉ, या सारख्या शिक्षण संस्थेचे मोठे जाळे आहे. सदर उमेदवारांनी शिक्षण संस्थेच्या शिक्षकांना, कर्मचाऱ्यांना शिक्षण संस्थचाच अध्यक्ष निवडणुकीत निवडून यावा, यासाठी संस्थेतील शिपायापासून प्राचार्यापर्यंत पोलिस स्टेशन, तहसील कार्यालय, तसेच उमेदवारांचे निवडणूक संपर्क कार्यालयासह मतदार संघातील गावोगावी अध्यक्ष आणि त्यांच्या गृहमंत्री आणि गृहमंत्र्यांच्या भाऊजी ( …आणि …मऊ) यांनी केलेले आदेश पाळत आहेत.
तालुक्यातील विविध नेत्यांचे पक्ष कार्यालय, उमेदवाराचे संपर्क कार्यालय अशा विविध ठिकाणी शिक्षण संस्थेतील शिक्षकापासून ते प्राचार्य पर्यंत संस्थाचालक आमदार व्हावा, या साठी गावोगावी रात्रंदिवस मीटिंग घेत, कार्यकर्त्यांना आर्थिक लाभ देत आहेत. निवडणुकीचे सर्व नियोजन तेच करत आहेत. याकडे निवडणूक निर्णय अधिकारी अथवा त्यांची टीम जाणून बुजून दुर्लक्ष करत आहेत. याकडे राज्य निवडणूक आयोगाने लक्ष देऊन योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी जनतेतून होत आहे.